शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
4
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
5
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
6
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
7
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
8
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
9
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
10
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
11
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
12
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
13
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
14
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
15
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
16
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
17
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
18
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
19
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
20
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 

जातपडताळणी सादर करण्यास आज शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:15 IST

नाशिक : समाजकल्याण विभागातील जातपडताळणी समितीच्या कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्च्यांची गर्दी कायम असून मंगळवारी (दि. १९) अनेक विद्यार्थ्यांना ...

नाशिक : समाजकल्याण विभागातील जातपडताळणी समितीच्या कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्च्यांची गर्दी कायम असून मंगळवारी (दि. १९) अनेक विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रतिक्षा करावी लागली. विद्यार्थ्यांना एकीकडे प्रतिक्षा करूनही जातपडताळणी प्रमाणपत्र मि‌ळत नसताना विविध अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रमाणपत्र सादर करण्यास महासीईटीने वाढवून दिलेली मूदतही बुधवारी (दि.२०) संपाणार आहे.त्यामुळे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ सुरु आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास कागदपत्रांची पडताळणी करताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होण्याचा अथवा खुल्या प्रवर्गातून प्रवेश गृहित धरण्यात येण्याचा धोका आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गर्दी केली जात आहे. मात्र जात पडताळणी दाखल्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तब्बल तीन ते चार महिन्यानंतर त्यांच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. अनेकांकडून त्रुटींची पुरतात केल्यानंतर ही त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. विशेष म्हणजे महासीईटीने प्रमाणपत्र सादर करण्यास वाढवून दिलेल्या मुदतीचाही एकच दिवस उरल्याने विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असून त्यात मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगत्या नियमांचेही सऱ्हास उल्लंघन होताना दिसून येत आहे.

इन्फो

गोपनीय माहिती उघड

समाज कल्याण विभागात जातपडताळणी कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरू आहे. जात पडताळणीसाठी गोपनीय पद्धतीने करण्याची कार्यवाही उघडपणे केली जात आहे. अर्जदाराच्या कागदपत्राविषयी साशंकता असल्यास पडताळणी समितीने संबधित यंत्रणेकडून गोपनीय पद्धतीने मागविणे आवश्यक आहे. परंतु , जात पडताळणी समितीने एका विद्यार्थ्याच्या जातीच्या दाखल्याची सत्यता जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले पत्र चक्क अर्जदाराच्या हातात ठेवून संबधित कार्यालयातून त्याच्या सतत्येचा अहवाल मागिवण्याचा पराकक्रम केल्याचे समोर आले आहे.

(१६पीएचजेएन९०)