शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आज मौसम भी पूरा दिन रोया हैं...!

By admin | Updated: July 29, 2015 00:58 IST

सोशल मीडियावर शोकसंदेश : नेटिझन्स हळहळले; कलाम यांच्या आठवणींना दिला उजाळा

नाशिक : ‘आज मौसम भी पूरा दिन रोया हैं, मेरे देश ने कलाम खोया हैं...’ अशा प्रकारचे भावपूर्ण शोकसंदेश आज दिवसभर सोशल नेटवर्क साईटवर फिरत होते. भारताचे अकरावे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अर्थात अबुल पाकीर जैनुलआबेदिन अब्दुल कलाम यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या विविध पोस्ट शेअर केल्या. मंगळवारी (दि.२८) रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर केवळ आणि केवळ कलाम यांना भावपूर्ण श्रध्दांजलीचेच संदेश विविध स्वरूपामध्ये ‘पोस्ट’ के ले जात होते. काहींनी कलामांचा अल्पसा परिचय, तर काहींनी कलामांचे दुर्मीळ प्रसंगाचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड केले तर काहींनी त्यांचे देश, विज्ञान व विद्यार्थ्यांवरील प्रेम अधोरेखित करणारे भावपूर्ण शोकसंदेशही टाकले. एकूणच सोशल मीडियावर मंगळवारचा दिवस हा कलामांना श्रध्दांजली देणारा ठरला. आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही आपल्या ग्रुपमध्ये मित्र-मैत्रिणींना शुभ सकाळपासून तर कोणत्याही शुभेच्छा देऊ नये, किंवा विनोद क रणेही टाळावे, त्याऐवजी सुविचार अथवा कलाम साहेबांच्या आठवणी जागविणारे पोस्ट अवश्य करावे, असे आवाहन बहुतांशी ग्रुप अ‍ॅडमिनकडून व्हॉट्सअ‍ॅपवर क रण्यात आले होते.सोशल मीडियावर झळकलेले काही निवडक शोकसंदेश असे, ‘आम्ही भारतीय एवढे ग्रेट आहोत की, अब्दुल कलाम यांच्यासारख्या वैज्ञानिकांच्यासुध्दा आत्म्याला शांती लाभो, अशी देवाकडे प्रार्थना करतो...’ ‘भारताचा अग्निकवच आज आपल्यातून निघून गेला, देशभक्ती, देशप्रेम आणि देशसेवा या कल्पनेचे अस्तित्व म्हणजे कलाम सर, कलाम तुम्हाला सलाम’ ‘अग्निपंखाचा शिल्पकार, खरा भारतरत्न हरपला....शतश: प्रणाम’ ‘डोन्ट डिक्लेअर हॉलिडे आॅन माय डेथ,, इनस्टेड वर्क अ‍ॅन एक्स्ट्रा डे, इफ यू लव्ह मी.’ - डॉ. अब्दुल कलाम. ‘ देख ले ओवेसी, आज पुरा देश एक सच्चे मुसलमान के लिये रो रहा हैं, बात मुसलमान की नहीं देश के साथ इमान की हैं...’ ‘कलियुग की रामायणकार राम चला गया... मेरे देश का कलाम चला गया... जो देता था एकता का पैगाम वो कलाम चला गया... जिसने दिया देश को परमाणु वो कलाम चला गया... क्या बताऊ दोस्तो वतन का सबसे बडा हमनाम चला गया... हमारा कलाम चला गया... ‘जो कहते है हिंदू-मुस्लीम से नफरत करते है, उन्हे देखना चाहियें, आज सारा भारत एक सच्चे मुस्लीम के लिये आंसू बहा रहा हैं...’, ‘ अरे कोणी सांगा त्या अबू आजमी, माजिद मेमन, ओवेसी आणि सलमानला कलाम यांच्या जाण्याने सारा भारत हळहळतोय, ते त्यांच्या धर्मामुळे नाही तर त्यांच्या कर्मामुळेच.... कारण माणूस धर्माने नाही तर कर्माने ओळखला जातो.’ ‘आज मौसम भी पूरा दिन रोया हैं, मेरे देश ने कलाम खोया हैं...’