शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आज मतदान साहित्याचे वाटप; यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:50 IST

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिकदिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे २५ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, साहित्याची वाहतूक करण्यासाठी बाराशे वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४७२० मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असले तरी, मतदानपूर्व तयारीसाठी रविवारी दुपारपर्यंत त्या त्या मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकाºयांनी हजर होऊन मतदान केंद्राची व सोमवारच्या मतदानाची तयारी पूर्ण करावी, असे नियोजन करण्यात आले आहे. या कामी सुमारे २५ हजार कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली असून, निवडणुकीपूर्वी त्यांना आजवर दोन वेळा प्रशिक्षण देऊन मतदानाची पद्धती, व्हीव्हीपॅटचा वापर व हाताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याच मतदारसंघातील रहिवासी असलेल्या कर्मचारी, अधिकाºयाला त्याच्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेले नाही. त्यामुळे निवडणूक प्रकिया पारदर्शीपणे पारपडेल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.रविवारी सकाळी पुन्हा शेवटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयी सहायक निवडणूक अधिकारी हे प्रशिक्षण घेतील तसेच मतदान केंद्रनिहाय कर्मचारी व अधिकाºयांना मतदानाचे साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघासाठी शहरातूनच साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्यात नाशिक पूर्व मतदारसंघाचे साहित्य वाटप पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथून, नाशिक मध्य मतदारसंघाचे दादासाहेब गायकवाड सभागृह येथून, नाशिक पश्चिमचे संभाजी स्टेडियम येथे, तर देवळाली मतदारसंघाचे गोदावरी हॉल, सार्वजनिक बांधकाम भवन येथून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. साहित्यानिशी कर्मचारी व अधिकाºयांची मतदान केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी बाराशे वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय