शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात तंबाखूची साठेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:44 IST

सटाणा : लॉकडाऊनच्या काळात सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली. परंतु, तंबाखू, सिगारेटचे व्यसन असणाऱ्या शौकिनांची मात्र चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे.

सटाणा : लॉकडाऊनच्या काळात सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली. परंतु, तंबाखू, सिगारेटचे व्यसन असणाऱ्या शौकिनांची मात्र चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने शहरात तंबाखू काळ्याबाजारात तिपटीच्या चढ्या दराने विक्र ी केली जात आहे. त्यामुळे शौकिनांना आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे चित्र आहे.शहरासह तालुक्यात लॉकडाऊन-पासून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह तंबाखू चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन गोडेतेल, शेंगदाणे, डाळ, दुधाचे पदार्थ आदी किराणा वस्तूंसह पाण्याच्या बाटल्यादेखील ग्राहकांना चढ्या भावाने खरेदी करण्याची वेळ आली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असता प्रशासनाकडून पक्क्या बिलाची मागणी केली जाते. वास्तविक प्रत्येक विक्रेत्याला आपल्या दुकानासमोर वस्तूंचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. मात्र शहरासह तालुक्यात कोणत्याही विक्रेत्याने दरपत्रक न लावता ग्राहकांची लूट सुरू केली आहे. ग्राहकांनी पक्क्या बिलाची मागणी केली तर त्याला वस्तू नाकारून कुचंबणा केली जात आहे. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून तंबाखूचे भाव तिपटीने वाढले आहेत. व्यापाऱ्यांकडून तंबाखूची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी करण्यात येत आहे.तंबाकू उपलब्ध नसल्याचे सांगून १५ रु पयांची तंबाखू तब्बल ६० रु पयांना विक्र ी केली जात आहे. तंबाकू विक्र ी करणारे मोठे रॅकेटच कार्यरत असून त्याचा अड्डा शहरातील ग्रामीण रु ग्णालय परिसरात आहे.खाकीतील काही मंडळीच्या कृपाशीर्वादाने त्यांचा व्यवसाय बिनबोभाट सुरु असल्याची चर्चा आहे प्रशासनाने अशा साठेबाज करणाºया व्यापाºयांचा आणि राजरोस चढ्या भावाने विक्र ी करणाºया टोळीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.----------------------------------बनावट मद्याचा पूर..शहर व तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मद्य विक्रीचे दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मद्याअभावी तळीरामांचे चांगलेच हाल होत आहे. दुकाने बंद असल्याचा फायदा घेऊन सर्रास अधिकृत कंपन्यांचे लेबल लावून राजरोस बनावट मद्य तयार करून चढ्या दराने विक्र ी केली जात आहे. याचे सटाणा शहरासह नामपूर, ताहराबाद, ठेंगोडा, वीरगाव या भागात अड्डे असून, त्याची अलिशान कारने ‘होम डिलेवरी’ केली जात असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashikनाशिक