शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

स्व-प्रमाणपत्र नोंदीसाठी टीईटीधारक रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:25 IST

राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नाशिक : राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आत्तापर्यंत सुमारे दीड हजार टीईटीधारकांची नोंदणी करण्यात आली असून, अजूनही नोंदणीचा ओघ सुरूच आहे.राज्यात टीईटी झालेले हजारो शिक्षक असून, हे शिक्षक नोकरीपासून वंचित आहेत. टीईटी झाल्यानंतरही त्यांना नोकरीची हमी मिळाली नसल्याने या शिक्षकांना नोकरीची प्रतीक्षा आहेच. नोकरीच्या अपेक्षेने टीईटीधारक शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले असताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्रांची नोंदणी बंधनकारक असल्याने त्यांची धावाधावा सुरू झाली आहे. विभागीय कार्यालयातच नोंदणीची व्यवस्था असल्याने विभागातील शिक्षक नाशिकमधील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत.राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांची नोंदणी सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत २१ जानेवारीपासून पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्राची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र यासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येण्याचे फर्मान दिल्याने चार जिल्ह्यांतील टीईटीधारकांना नाशिकमध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. यामध्ये संपूर्ण दिवस जात असल्याने नाराजी निर्माण झाली आहे. गरजू बेरोजगारांना टीईटीधारक उसनवारी करून नाशिकमध्ये आल्याचे सांगितले जाते तर कुणी महिला तान्ह्या बाळाला घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहचत आहेत.आतापर्यंत सुमारे १५००हून अधिक बेरोजगार शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातून स्व- प्रमाणपत्राची नोंद केली आहे. मात्र यासाठी लांबचा प्रवास करावा लागत असल्याने विभागीय पातळीवर नोंदणी न करता जिल्हा पातळीवर नोंदणीची व्यवस्था असावी, अशी मागणी या टीईटीधारकांनी केली आहे. परंतु ही नोंदणी जिल्हानिहाय ठेवली असती तर या उमेदवारांचा वेळ आणि पैसा वाचला असता. काही उमेदवार हे शनिवारपासून नाशिक शहरात आले होते. तर सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच रांगेत उभे होते.जिल्हानिहाय नोंदणी व्हावीटीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला विभागीय कार्यालय म्हणून नाशिकला येऊन नोंदणी करावी लागते. विभागातून टीईटीधारक येत असल्याने गर्दी आणि परिणामी विलंबही होतो. यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांचे दोन दिवस वाया जात अससल्याने प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीNashikनाशिक