शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तिसगाव, सोनजांबला विलगीकरण कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:10 IST

दिंडोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णालयात जागा मिळणे अशक्य होत असल्याने, तिसगाव ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांसाठी जनता विद्यालयात मंगळवार (दि.२०) पासून विलगीकरण कक्ष सुरू होणार आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचा पुढाकार : लोकवर्गणीतून केली उभारणी

दिंडोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णालयात जागा मिळणे अशक्य होत असल्याने, तिसगाव ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांसाठी जनता विद्यालयात मंगळवार (दि.२०) पासून विलगीकरण कक्ष सुरू होणार आहे.सोनजांब येथील ग्रामस्थांनीही कोरोनासोबतची लढाई संपूर्ण गाव मिळून लढणार असल्याची योजना आखली आहे. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत, मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभे केले आहे. सोमवारी या कोविड सेंटरचे उद्घाटन जि.प. सदस्य भास्कर भगरे, डॉ.सावंत, सोनजांबचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले. गावातील सप्तशृंगी लॉन्समध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. यासाठी येणारा खर्च गावातून वर्गणी काढून करण्यात येत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत एक लाखापेक्षा अधिक रक्कम जमा झाली. सोनजांब येथील रुग्णांना गावातच विलगीकरण कक्ष तयार करून, डॉक्टरही नेमण्यात आले आहेत. यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजनांची तयारी करूनच कोविड सेंटर उभे करत असून, गावकऱ्यांना गावातच कोविडवर उपचार होणार असल्याने बेडसाठी होणारी धावाधाव आदी अनेक समस्यांवर तोडगा निघेल, असा विश्वास सोनजांब ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.सर्वच ग्रामपंचायतकडून गावात विलगीकरण कक्ष उभारावेत, यासाठी गावातील शाळा किंवा योग्य असेल, त्या खोल्या ताब्यात घेऊन तिथे कोविड सेंटर उभे करावे व त्यासाठी येणारा खर्च हा १५ वित्त आयोगातून खर्च करण्याची परवानगी द्यावी. त्याकरिता राज्याच्या ग्रामविकासमंत्री यांना मेलही केला आहे.- अश्विनी भालेराव, ग्रा.प. सदस्य, तिसगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य