शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

रेशनच्या धान्यावर तूरडाळीची सक्ती

By admin | Updated: September 1, 2016 00:47 IST

नवा फंडा : ...तरच धान्याची उचल

नाशिक : शिधापत्रिकाधारकांना दुय्यम दर्जाची महाग तूरडाळ रेशनवरून देण्यास नकार देणाऱ्या रेशनदुकानदारांना वठणीवर आणण्यासाठी पुरवठा खात्याने नवीन फंडा शोधून काढला असून, सप्टेंबर महिन्यासाठी धान्याबरोबर तूरडाळीची विक्री करण्याची अप्रत्यक्ष सक्ती करण्याचे ठरविले आहे, त्यासाठी धान्य उचलीचे चलनच मंजूर न करण्याच्या सूचनाही पुरवठा अव्वल कारकूनांना देण्यात आल्या आहेत. खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव वाढल्यामुळे गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात रेशनमधून तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्यासाठी खासगी पुरवठादारांकडून निविदा मागवित तूरडाळ पुरविण्याचा ठेका दिला. प्रती शिधापत्रिकाधारकाला १०३ रुपये किलोप्रमाणे एक किलो या प्रमाणात तूरडाळ वितरित करण्याचे ठरलेले असताना, जिल्ह्यासाठी पावणेपाच हजार क्विंटल तूरडाळ दाखलही झाली, परंतु रेशनवर तूरडाळ उपलब्ध होताच, खुल्या बाजारातील तूरडाळीचे दर कमालीचे कमी झाले, त्याचबरोबर रेशनवरील तूरडाळ दुय्यम दर्जाची असल्याची तक्रार करीत रेशन दुकानदारांनी ती उचलण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून तूरडाळीच्या एका कणाचीही विक्री होेऊ शकलेली नाही, उलट शासनाकडून याबाबत तगादा सुरू झाल्याने पुरवठा खाते अडचणीत सापडले. शासनाने तूरडाळीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले असताना त्यातून एक रुपयाचीही कमाई होत नसल्याचे पाहून सप्टेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांसाठी वाटप केल्या जाणाऱ्या अन्नधान्याबरोबर तूरडाळही माथी मारण्याचा निर्णय पुरवठा खात्याने घेतला आहे. त्यासाठी रेशन दुकानदारांकडून अन्नधान्य उचलण्यासाठी भरले जाणारे चलन मंजूर न करण्याचे ठरविण्यात आले आहे. जो रेशन दुकानदार तूरडाळ विक्रीसाठी घेईल त्याचेच धान्याचे चलन मंजूर करण्यात येणार आहे. याचाच अर्थ शिधापत्रिकाधारकांनाही तूरडाळ खरेदीची सक्ती करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)