शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

डाटा आॅपरेटर ठेकेदारांचे आयोगाकडे थकले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:21 IST

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेतली जात असताना प्रत्यक्ष आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाइन काम करणाºया राज्यातील हजारो डाटा एंट्री आॅपरेटर ठेकेदारांना मात्र त्यांच्या वेतनाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेतली जात असताना प्रत्यक्ष आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाइन काम करणाºया राज्यातील हजारो डाटा एंट्री आॅपरेटर ठेकेदारांना मात्र त्यांच्या वेतनाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्य सरकारकडे निधीची मागणी करूनही ती मिळत नसल्याचे कारण आयोगाकडून दिले जात असल्यामुळे यंदाची दिवाळी या कर्मचाºयांना पगाराविनाच साजरी करावी लागण्याची चिन्हे आहेत.  मतदार पुनरीक्षण मोहिमेत दररोज किती कामे झाली याची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले, त्याचबरोबर दर दोन, चार दिवसांआड मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्णाचा व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आढावा घेतला जात असल्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाºयांवर या कामाचा प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. बीएलओंकडून गोळा केलेले मतदार अर्ज आॅनलाइन सबमिट करण्यासाठी प्रसंगी डाटा आॅपरेटरची संख्या वाढवा, असा सल्लाही दिला जात आहे. राज्यात निवडणूक आयोगाचे आॅनलाइन काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णात ठेकेदार नेमण्यात आले आहेत. या ठेकेदारांकरवी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरमहा एक ते दहा तारखेच्या आत या कर्मचाºयांना वेतन देणे अपेक्षित आहे. परंतु डाटा एंट्री करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराला निवडणूक आयोगाकडूनच दर महिन्याला केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याने तो कर्मचाºयांना देण्यास विलंब करीत आहे. दररोज चौदा ते सोळा तास हे कर्मचारी काम करीत असून, तरीही त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे तीन ते चार महिन्यांपासून त्यांना वेतनच दिले गेले नसल्याने काही जिल्ह्णांमध्ये कर्मचाºयांनी काम सोडणे पसंत केले तर जे सध्या काम करीत आहेत, त्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे.मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील ठेकेदारांचे फेब्रुवारी ते मार्च त्याचबरोबरच जुलै ते सप्टेंबर असे पाच ते सहा महिन्यांचे वेतनच आयोगाने अदा केलेले नाही. मतदार पुनरीक्षण मोहीम ३१ आॅक्टोबरअखेर असून, वेळेत काम पूर्ण करून घेण्यासाठी निवडणूक अधिकाºयांकडून डाटा एंट्री करणाºया कर्मचाºयांना तगादा लावला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकonlineऑनलाइन