नाशिक : न्यायालयाच्या आवारातच पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करणार्या कुप्रसिद्ध टिप्पर गॅँगच्या संशयित आरोपींनी कारागृहात एकमेकांच्या अंगावर वार करून घेत पोलिसांनीच मारहाण केल्याचा बनाव रचल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला.सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गॅँगचे मोक्का कलमान्वये स्थानबद्ध असलेले समीर नासीर पठाण, नागेश भगवान सोनवणे, गणेश सुरेश वाघ, सोनल रोहिदास भडांगे, नितीन बाळकृष्ण काळे, सुनील भास्कर अनर्थे, सुनील दौलतराव खोकले व अनिल पंडिता अहेर यांना बुधवारी दुपारी मोक्का न्यायालयात तारीख असल्याने हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्यासाठी गाडीमध्ये बसविण्यात येत होते. यावेळी मोबाइलवर बोलण्यास मज्जाव केला म्हणून संशयितांनी पोलीस नाईक गुंबाडे व उपनिरीक्षक सचिन सावंत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती़ यानंतर सर्व संशयितांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दुपारी सव्वातीनच्या सुमारास दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर यातील मुख्या संशयित आरोपी समीर पठाण व तिघा-चौघा संशयितांनी एकमेकांच्या अंगावर ब्लेडसदृश वस्तूने वार करून घेतले व पोलिसांनीच मारहाण केल्याचा बनाव रचना. पोलिसांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप संशयितांनी कारागृह प्रशासनाकडे केला असून, वैद्यकीय तपासणीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने सायंकाळी सहा ते साडेआठ वाजेच्या सुमारास कारागृहातून समीर पठाण, नागेश सोनवणे, गणेश वाघ, सोनल भडांगे, नितीन काळे, सुनील अनर्थे यांना जिल्हा रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करून कारागृहात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक व पोलीस नाईक यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजल्यानंतरच संशयितांनी स्वत:हून जखमी होण्याचा बनाव रचल्याचे बोलले जात आहे. टिप्पर गँगने हाताच्या नखाने एकमेकांना ओरबडून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे; परंतु जखमा पाहता त्या हाताची नखे की त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या ब्लेडने हे मात्र गुपित आहे़ (प्रतिनिधी)हा केवळ बनाव बोलीस उपनिरीक्षक व पोलीस नाईक यांना मारहाण केल्याच्या गुन्ातून वाचण्यासाठी पोलिसांवरच आरोप करत मारहाण केल्याचा बनाव टिप्पर गँगने केला आहे़ त्यांनी स्वत:च्या अंगावर जखमा करून घेतल्या. आमचे मेडिकल करा व पोलिसांवरही गुन्हा दाखल करा, असा आरडाओरड ते करत होते़ परंतु प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेली त्यांची वैद्यकीय तपासणी व कारागृहातील नोंदीवरून पोलिसांनी त्यांना कोणतीही मारहाण केली नाही, तर त्यांनी स्वत: हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे़ - हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणेकारागृह डायरीला नोंदसंशयितांना दुपारी सव्वातीन वाजता मध्यवर्ती कारागृहात दाखल करताना त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली होती; मात्र त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी मारहाण केल्यानेच जखमी झाल्याचे संबंधित संशयित कारागृह प्रशासनाला सांगत होते़ त्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सायंकाळी पोलीस पथकाने संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले. कारागृहाच्या डायरीला दुपारी कारागृहात दाखल करताना संशयितांची शारीरिक तपासणी केली असता ते जखमी नव्हते; मात्र त्यानंतर त्यांच्या अंगावर जखमा असल्याची नोंद केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी सांगितले.
टिप्पर गँगचे स्वत:वर वार
By admin | Updated: May 8, 2014 23:13 IST