शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 13:05 IST

खेडलेझुंगे : नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या विविध समस्यांवर चर्चा करु न निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

खेडलेझुंगे : नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या विविध समस्यांवर चर्चा करु न निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.गावपातळीवर काम करणाºया या कर्मचार्यांना एक ते दिड वर्षापासुन मानधनच आदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे या केंद्रचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकरी कर्ज माफी, अिस्मता योजनेसाठी ठरलेले मानधन अदा करण्यात आले नाही तर दिनांक २४ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापुढील दहा दिवसांत प्रश्न मार्गी लागले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असे उपाध्यक्ष राकेश देशमुख कळविले आहे.ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दरात सेवा देण्यासाठी शासनाने आपले सरकार सेवा केंद्रांची उभारणी केलेली आहे. त्यामध्ये मासिक सहा हजार इतके मानधन अत्यल्प मानधनावर केंद्रचालकाची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतीचे कामकाज, महसुली सेवा, दाखले, उतारे आदी सेवा नागरीकांना पुरविण्याचे कामकाज या केंद्र चालकांकरवी करण्यात येते. परंतु या कर्मचार्यांना त्यांचे ठरविलेले कामकाज सोडुन इतर सर्व योजनांचे कामकाज लादुन करु न घेतले जाते. त्यामुळे दैनंदिन नेमुन दिलेले कामकाज अपुर्ण राहुन नागरिकांना सेवा देणे अवघड होत आहे.प्रकल्प सुरु होऊन केंद्र चालकांच्या नेमणुकाही झालेल्या आहे परंतु कंपनीच्या बेजबाबदार प्रशासनामुळे दिडर्षापासुन बर्याच केंद्रचालकांचे मानधन अदा करण्यात आलेले नाही. पंचायत समतिी स्थरावरील संगणक परिचालकाची नेमणुक करणेबाबत शासन आदेश जारी होवुनही नियुक्ती करण्यात आलेली नाही. माहे एप्रील, मे, जुन २०१७ चे मानधन जिल्हा परिषदेकडून कंपनीकडे वर्ग होवूनही केंद्रचालकांचे मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदरील महिन्यांचे मानधन व्याजासहीत मिळावे अशी मागणी संघटनेकडुन होत आहे. ग्रामपंचायतीकडुन जिल्हा परिषदेला प्रति केंद्रचालकाच्या मानधनापोटी मासिक १२ हजार रु पये प्रमाणे वर्षाची रक्कम आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच अदा करण्यात येते. त्यातुन सहा हजार रु पये मानधन या केंद्र चालकांना देण्यात येते. सदरची रक्कम कंपनीकडे जमा असुनही केंद्र चालकांना या मिहन्यांचे मानधन आदा करण्यात आलेले नाही. माहे जुलै २०१८ ते मार्च २१९ पर्यंतच्या रकमेचे धनादेश नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत जमा नसल्याने पुढील मानधन कसे आणि कधी होणार याबाबत शाश्वती नाही.

टॅग्स :Nashikनाशिक