शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव तुकड्यांवरील शिक्षकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:10 IST

राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अशा अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीव तुकड्यांवर नियुक्त शिक्षक मात्र वर्षानुवर्ष विनावेतन काम करीत असून

नाशिक : राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अशा अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीव तुकड्यांवर नियुक्त शिक्षक मात्र वर्षानुवर्ष विनावेतन काम करीत असून, त्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्न केवळ विनाअनुदानित तुकड्यांच्याबाबतीतच आहे असे नाही तर विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचीही अशीच परिस्थिती आहे.राज्यात सन २००० पासून कायम विनाअनुदानित शाळांचे धोरण सुरू झाले. या धोरणातील कायम हा शब्द काढून टाकावा यासाठी शिक्षण संस्थाचालकांनी व्यापक प्रयत्न केल्यानंतर २००९ मध्ये या धोरणातील ‘कायम’ हा शब्द काढून टाकण्यात आला. विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त करण्यात आलेले शिक्षक आजही विनावेतन काम करीत असून, काही संस्थाचालकांकडून शिक्षकांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. शाळा विनाअनुदानित असल्यामुळे शिक्षकांची पदेदेखील मंजूर नसल्याने या शिक्षकांच्या नोकऱ्यांना संरक्षणदेखील मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अनुदानित शाळांना शासनाचे अनुदान मिळतेच शिवाय आता तर शिक्षकांना सातवा वेतन आयोगदेखील लागू करण्यात आलेला आहे. परंतु याच अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीच्या तुकडीवर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या पदरी मात्र निराशाच आहे. अनुदानित शाळांच्या शिक्षकांप्रमाणे काम करूनही नैसर्गिक वाढीच्या तुकडीवर शिक्षकांना कामाचा दाम दिला जात नाही ही शोकांतिका आहे. राज्यात अशाप्रकारे नैसर्गिक वाढीच्या तुकडीवर काम करणाºया शिक्षकांची संख्या साडेचार हजार इतकी आहे.विनाअनुदानित शाळा, नैसर्गिक वाढीव वर्ग तसेच या वर्गांवर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान दयावे, सर्व विनाअनुदानित शाळा, वर्ग तुकड्यांना अनुदानित जाहीर करावे यासाठी या शिक्षकांचा लढा सुरू आहे.अनुदानीत शाळांमधील वाढीव तुकड्यांवरील शिक्षकांना शासन तसेच संस्थेकडूनदेखील विचारले जात नसल्याने राज्यभरातील सुमारे सहा हजार पेक्षा अधिक शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत़वाढीव तुकड्यांबाबत शिक्षकांचा आवाज तोकडाअनुदानित शाळांना जोडून असलेल नैसर्गिक वाढीव वर्ग तुकड्यांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना पात्र ठरविण्यासाठी संस्थांकडून रोष्टर आणि शासनाच्या मान्यतेचा प्रश्न पुढे केला जातो. त्यामुळे वाढीव तुकड्यावरील शिक्षक अधिकारापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे विनावेतन काम करणाºया वाढीव तुकडीवर बहुतांश मागासवर्गीय उमेदवार असल्याने त्यांचा आवाज अद्याप शासनाला ऐकू जात नसल्याचा आरोपही या शिक्षकांकडून केला जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक