शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही इदगाह मैदानावरच गणेशमूर्ती विक्रीचे गाळे

By admin | Updated: July 9, 2017 00:29 IST

नाशिक : गणेशमूर्ती विक्रीच्या गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया महापालिकेमार्फत राबविली जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दि. २५ आॅगस्टपासून गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गणेशमूर्ती विक्रीच्या गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया महापालिकेमार्फत पुढील आठवड्यापासून राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील वर्षाप्रमाणे यंदाही इदगाह मैदानावरच गणेशमूर्ती विक्रीचे गाळे उभारण्यास परवानगी दिली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर गणेशमूर्ती विक्री गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया महापालिकेमार्फत राबविली जात असते. त्यामुळे बरेच वादही उद्भवत असतात. यंदा महापालिकेने महिनाभर अगोदरच गाळे विक्रीची प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही इदगाह मैदानावर गाळे उभारणीसाठी परवानगी दिली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्तीच्या गाळ्यांबाबत विक्रेत्यांकडून वाद घातला जात होता. विक्रेत्यांकडून परवानगी नसतानाही जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेरील जागेत गाळे उभारले जात असत. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीच्या कालावधीत सदर विक्रेत्यांना पोलिसांसह महापालिकेने जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात गाळे उभारणीस मनाई केली होती. मागील वर्षीही ही मनाई कायम राहिली. त्यामुळे विक्रेत्यांना इदगाह मैदानावर गाळे उभारणीस परवानगी देण्यात आली व त्याबाबत लिलावप्रक्रिया राबविण्यात आली होती. महापालिकेने आता दरवर्षी इदगाह मैदानावरच मूर्ती विक्रीसाठी गाळे उभारण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.