शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये कॅप्टनच्या वृद्ध पत्नीला उपोषणाची वेळ

By श्याम बागुल | Updated: August 28, 2018 14:30 IST

कॅप्टन मनोहर कापडणीस हे सैन्यदलातून १९९६ साली सेवानिवृत्त झाले आणि २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सैन्यदलाकडून देण्यात येणारी पेन्शन त्यांची पत्नी मंडोधरा कापडणीस यांना देण्याची पेमेंट पेन्शन आॅर्डर सटाणा येथील स्टेट बँकेला देण्यात आली होती. मात्र आदेशानुसार नियमानुसार

ठळक मुद्देपेन्शन प्रकरण : माहिती देण्यास टाळाटाळ तक्रार केल्यानंतर कपात केलेली रक्कम बँकेने पुन्हा परत केली

नाशिक : पेन्शनची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेच्या विरोधात सैन्यदलातील कॅप्टनच्या वृद्ध पत्नीने मुलासह बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.कॅप्टन मनोहर कापडणीस हे सैन्यदलातून १९९६ साली सेवानिवृत्त झाले आणि २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सैन्यदलाकडून देण्यात येणारी पेन्शन त्यांची पत्नी मंडोधरा कापडणीस यांना देण्याची पेमेंट पेन्शन आॅर्डर सटाणा येथील स्टेट बँकेला देण्यात आली होती. मात्र आदेशानुसार नियमानुसार पेन्शन दिली गेली नाही. नियमानुसार १५ हजार ४६५ रुपये पेन्शन असताना बँकेकडून ३ हजार ३३६ रुपये पेन्शन देण्यात येत होती. मंडोधरा कापडणीस यांनी तक्रार केल्यानंतर बँकेने चूक मान्य करीत २०१२ मध्ये बँकेने ६ लाख ३६ हजार ७२३ रुपये फरक म्हणून टप्प्याटप्प्याने २०१७ पर्यंत दिला. फरकाची रक्कम ११ लाख २६ हजार ७६४ असल्याचे कापडणीस यांचे म्हणणे आहे. त्यानंतर जास्त पैसे दिले गेलेत म्हणून बँकेने कापडणीस यांच्या पेन्शनमधून ८ हजार ४०० रुपयांची दरमहा कपात करण्यास सुरुवात केली. कापडणीस यांनी पुन्हा तक्रार केल्यानंतर कपात केलेली रक्कम बँकेने पुन्हा परत केली. बँकेच्या या घोळामुळे पेन्शनची तफावतीची कागदपत्रे बँकेकडे मागितली असता बँकेने देण्यास टाळाटाळ केली आहे. ही कागदपत्रे मिळावीत म्हणून मंडोधरा कापडणीस आणि त्यांचा मुलगा विजय कापडणीस हे दोघे मायलेक बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर सोमवारपासून उपोषण बसले आहे. सैन्यदलातील अधिका-याच्या मृत्यूनंतर पत्नीला अशाप्रकारे संघर्ष करावा लागत असल्याची प्रतिक्रिया मंडोधरा कापडणीस यांनी व्यक्त केली आहे. तर ही न्यायालयीन बाब असून न्यायालयाकडून कागपत्रे घ्यावीत, असे बँकेच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :bankबँकNashikनाशिक