शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लोककलांवतांवर उपासारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:45 IST

सर्वतिर्थ टाकेद : सद्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांना उपासमारीने मरणापेक्षा आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या किंवा शासकिय मदत द्या या आशयाचे निवेदन आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहिर उत्तमराव गायकर वाघेरे यांनी निवासी उप जिल्हाधिकारी डोईफोडे यांचे कड़े निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासकीय मदत देण्याची मागणी

सर्वतिर्थ टाकेद : सद्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने लोककलावंतांना उपासमारीने मरणापेक्षा आम्हाला ईच्छा मरणाची परवानगी द्या किंवा शासकिय मदत द्या या आशयाचे निवेदन आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहिर उत्तमराव गायकर वाघेरे यांनी निवासी उप जिल्हाधिकारी डोईफोडे यांचे कड़े निवेदनाद्वारे मागणी केली आहे.कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर सद्या यात्रा,उरूस, जयंती, महोत्सव, लग्न वाढदिवस, समारंभ, सोहळे इत्यादि सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत . हे कार्यक्रम सुरू व्हायच्या आतच कोरोनाच्या वैश्विक महामारीने लोककलावंतांच्या संसाराची धुळधाण झाली. कोरोनाने मरण्याऐवजी कलावंताला उपासमारीनेच मरण्याची भिती निर्माण झाली आहे . मुलांचं शिक्षण, लग्नकार्य, आजारपण उपजीविकेसाठी लागणारी साधनसामग्री कुठून आणायची. सरकारकडे अनेक कलावंतांनी साकडं घातलं मात्र त्याकडं दुर्दैवाने दुर्लक्ष झालं .या बत्तर जिण्यापेक्षा मेलेलं बरं ! अशी आवस्ता लोककलावंतांची झाली आहे. याकरिता लोककलावंतांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी असे निवेदनच गायकर यांनी दिले आहे .महाराष्ट्राच्या जडणघडणीत, लोकसंस्कृती जपुन ठेऊन ती जोपासण्याचे मौलिक व समाजप्रबोधानाचे काम लोककलावंतांनी केले आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून "लोकरंजनातून लोकशिक्षण "देण्याचं महनीय कार्य लोककलावंतांनी केलेले असतांना उपेक्षित लोककलावंताला दुसरा मार्गच शिल्लक नसल्याने आपण इच्छा मरणास परवानगी द्यावी .किंवा शासनाने प्रत्त्येक लोककलावंताला नुकसान भरपाई म्हणुन एक लाख रुपये मदत म्हणून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. (२६ टाकेद)--------------------सद्या कोरोणाच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच लोककलावंतांवर उपासमारीची वेळ सुरू झाली आहे.शासनाने २००८ साली तमाशाला शासकिय अनुदान दिले व नंतर ते बंद केले ते पुन्हा सुरू करावे, म्हाडा प्रकल्पामध्ये पाच टक्के व पंतप्रधान घरकुल योजने मध्ये पांच टक्के आरक्षण द्यावे तसेच आमच्या लोककलावंताना पंधरा हजार रूपये महिना पेन्शन मिळावी या बाबदचे निवेदन दिले आहे. या बाबत बाबासाहेब पाटील यांनी मागण्या मान्य करू पण कुणीही उपोशन करू नका असे दिलेले आश्वासन त्वरीत पुर्ण करावे व आमचे होणारे हाल थांबवावे ही विनंती.-मंगला बनसोडे करवडीकर, तमाशा फड मालक, सातारा.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवार