शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:14 IST

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वावीसह योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. वावीसह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.सुमारे पाच वर्षांपूर्वी गोदावरी उजवा कालव्याजवळ कोळगावमाळ येथे तलाव करुन वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमुळे वावी व परिसरातील गावांचा टॅँकर बंद झाला होता. मात्र योजना झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यत्यय येऊन पाणीपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत असतो. पाणीयोजनेला लागलेले समस्यांचे ग्रहण कायम असल्याने योजनेतील गावांना टंचाईचा सामना करण्याची वेळ येते.गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील तलावावर विद्युत जलपंपाचे स्टार्टर नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त केल्यानंतर त्याच दिवशी विद्युत जलपंप जळाला आहे. पाणीउपसा करणारे दोन्ही विद्युत जलपंप जळाल्याने वावी येथील जलकुंभात पाणी आले नाही. तलाव पाण्याने पूर्णपणे भरलेला असतांना केवळ तांत्रिक कारणामुळे वावीसह कहांडळवाडी, दुशिंगपूर, सायाळे, मलढोण, मिठसागरे, शहा या गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले असतांना वावीसह परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्व कूपनलिका कोरड्या पडल्या आहे. विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसल्याने योजनेतील हजारों ग्रामस्थांना टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. खासगी टॅँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ वावीसह परिसरातील ग्रामस्थांवर आली आहे.पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थांची गैरसोय विचारात घेऊन तातडीने तांत्रिक अडचणी दूर करुन पाणीपुरवठा करण्याची मागणी वावीसह योजने समाविष्ट असलेल्या ग्रामस्थांनी केली आहे.