शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

मुदतठेवी मोडण्याची वेळ

By admin | Updated: March 25, 2017 00:07 IST

नाशिक : आर्थिक खाईत लोटलेल्या पालिकेकडे आता कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भूसंपादनासाठी लागणारी रक्कम अदा करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने मुदतठेवी मोडण्याची वेळ आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नाशिक : नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करत भाजपाने महापालिका ताब्यात घेतली परंतु, आर्थिक खाईत लोटलेल्या पालिकेकडे आता कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भूसंपादनासाठी लागणारी रक्कम अदा करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने मुदतठेवी मोडण्याची वेळ आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, स्पीलओव्हर ६५० कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला असून, येणाऱ्या अर्थसंकल्पात नवीन विकासकामांना फारसा वाव राहणार नसल्याचे चित्र आहे. महापालिकेचे सन २०१६-१७ या वर्षासाठी १३५८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तत्कालीन आयुक्तांनी सादर केले होते परंतु उत्पन्नाची जमा बाजू पाहता सदर अंदाजपत्रक हे जेमतेम ११०० कोटींवर जाऊन पोहोचणार आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका जंगजंग पछाडत आहे. एलबीटीच्या अनुदानापोटी महापालिकेला दरमहा शासनाकडून ३१.९१ कोटी रुपये प्राप्त होत होते परंतु जानेवारी महिन्याचे अनुदान कपात करत केवळ १० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. फेबु्रवारी व मार्चच्या अनुदानातही ही कपात कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेला येत्या ३१ मार्चपर्यंत स्मार्ट सिटी अभियानासाठी स्थापन झालेल्या कंपनीच्या खात्यावर कोणत्याही परिस्थितीत मनपाचा हिस्सा म्हणून ४५ कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यामुळे एकूणच आर्थिक अडचणीत सापडलेल्या मनपाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तसेच भूसंपादनांच्या प्रस्तावांसाठी रक्कम अपुरी पडत  आहे.  गेल्या वर्षभरात स्थायी समितीकडून मोठ्या प्रमाणावर भूसंपादनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. महापालिकेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी भूसंपादनाकरिता ८९.३५ कोटी रुपयांची तरतूद केलेली होती परंतु ही संपूर्ण रक्कम संपली असून आतापर्यंत सुमारे १२५ कोटी रुपये भूसंपादनाकरिता अदा करण्यात आले आहेत याशिवाय, सुमारे १३० ते १५० कोटी रुपयांचे आणखी प्रस्ताव पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामुळे महापालिकेवर प्रचंड आर्थिक ताण आलेला आहे. त्यातच काही विकास प्रकल्पांची देयकेही देण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.  आर्थिक गाळात रुतलेल्या महापालिकेने आता निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मुदतठेवींकडे आपली नजर वळविली असून, सन २०१५-१६ मध्ये महापालिकेने उद्दिष्टापेक्षा जास्त मिळविलेल्या एलबीटी अनुदानातील सुमारे ७० कोटी रुपयांची मुदतठेव मोडण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सन २०१५-१६ मध्ये महापालिकेने एलबीटीचे ७५१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते परंतु प्रत्यक्षात महापालिकेने अधिक कार्यक्षमता दाखवत ८३३ कोटी रुपयांची वसुली केली होती. त्यामुळे शासनाने जानेवारी ते मार्च १६ या तीन महिन्यांतील अनुदानात कपातही केली होती आणि महापालिकेला जादा रक्कम दिल्याचे कळविले होते. त्यामुळे महापालिकेने सुमारे ७० कोटी रुपयांची मुदतठेव बॅँकेत ठेवली होती. आता हीच मुदतठेव मोडण्याचा विचार सुरू झाला आहे. (प्रतिनिधी)