शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२००९ पर्यंत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:19 IST

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा शेतकºयांचाही योजनेत समावेश करून  त्यांनाही दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा शेतकºयांचाही योजनेत समावेश करून त्यांनाही दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा बॅँकेने थकबाकीदार शेतकºयांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी आवाहन केले असून, त्यात म्हटले आहे की, ज्या शेतकºयांनी २००१ ते २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत कर्जाची परतफेड केली नसेल व ज्या शेतकºयांना ३० जून २०१६ पर्यंत कर्जमाफी देण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा झाला नसेल अशा शेतकºयांनाही आता शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २००१ ते २००९ पर्यंत घेतलेले व थकीत झालेले दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकºयांनी या संदर्भात जिल्हा बॅँकेशी संपर्क साधावे, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे. शासनाने २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्ज घेतले, परंतु त्यांनी परतफेड केली नाही, अशा थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जावर ११ ते १२ टक्के व्याजाची आकारणी केली जात आहे. अशा शेतकºयांनी थकबाकी भरल्यास त्यांना फक्त ६ टक्के व्याजाची आकारणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हा बॅँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी कर्ज भरून व्याजाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केदा अहेर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी