शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टिळकवाडी सिग्नल : पोलिसांचा खटाटोप;अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:49 IST

तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजुन्या पंडित कॉलनीच्या वळणावर पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले नाहीरोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रियाबॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती

नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.टिळकवाडी सिग्नलवरून पुढे तरण तलाव सिग्नल अथवा कॅनडा कॉर्नर आणि सीबीएसच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदी घालण्यात आली. हा उपाय जुन्या पंडित कॉलनीत निर्माण होणा-या वाहतूक कोंडीच्या समस्येवर पोलिसांनी शोधून काढला आहे. रस्त्यावर उभ्या राहणा-या चारचाकी वाहनांमुळे दुहेरी वाहतुकीसाठी हा रस्ता कमी पडत असताना पोलिसांनी अवैधरीत्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी एकेरी वाहतूक सुरू केली; मात्र एकूणच रोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत आहेत.एकेरी वाहतुकीचा फज्जासरकारवाडा पोलीस ठाण्याकडून येणारी वाहतूक शहर वाहतूक शाखेला अपेक्षित असल्याप्रमाणे सरळ मॅरेथॉन चौकापर्यंत न जाता जुन्या पंडित कॉलनीतून वळण घेत टिळकवाडी सिग्नलवरून पुढे मार्गस्थ होत आहे. यामुळे एकेरी वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीपेक्षा फज्जा अधिक उडाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जुन्या पंडित कॉलनीच्या वळणावर पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले नाही, त्यामुळे वाहने सर्रास वळण घेत सिग्नलपर्यंत येतात आणि येथे बॅरिकेड बघून पुन्हा माघारी न जाता बॅरिकेडच्या पुढे किंवा शेजारी उभे राहून सीबीएस-कॅनडाकॉर्नरचा सिग्नल लागताच अचानकपणे पुढे वाहने दामटवितात; मात्र यावेळी विरुद्ध बाजूच्या सुटणा-या सिग्नलमुळे वाहने समोरासमोर येऊन अपघाताची स्थिती उद्भवते.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी