शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भितीमुळे एकलहरे वसाहतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:05 IST

नाशिक : येथील एकलहरे विद्युत केंद्र वसाहतीत कोरोना संशयित असल्याच्या अफवांना ऊत आला होता. काही मंडळींनी खातरजमा न करता ...

ठळक मुद्देएकलहरे वसाहतीत सुरक्षा व्यवस्था कडक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सुचना

नाशिक : येथील एकलहरे विद्युत केंद्र वसाहतीत कोरोना संशयित असल्याच्या अफवांना ऊत आला होता. काही मंडळींनी खातरजमा न करता सोशल मीडियावर मेसेज पाठविल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली होती. मात्र सदर रु ग्ण साक्रीचा असून, पत्ता एकलहरेचा दिला असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र त्या रु ग्णाच्या नातेवाइकाचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने या प्रकरणावर पडदा पडला. मात्र एकलहरेच्या सीमेवर असलेले माडसांगवी, शिलापूर, ओढा या गावांमध्ये कोरोना पॉझेटिव्ह रु ग्ण आढळल्यामुळे येथील वीज केंद्र प्रशासनाने एकलहरे वसाहतीत प्रवेश करणाऱ्यांसाठी सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. वसाहतीबाहेरून  बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नवीन नागरिकांच्या वाहनांची नोंद करून, त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार नंबर, कोणाकडे जायचे इत्यादी माहिती नोंदवून प्रवेश दिला जात आहे. वसाहतीतील रहिवाशांच्या बाबतही नियम कडक करण्यात आले आहेत. वीज केंद्रातील काही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक हे लॉकडाऊन काळात परजिल्ह्यात, बाहेरगावी अडकल्याने आता पुन्हा वीज केंद्र वसाहतीत वेळी-अवेळी पूर्व सूचना न देता विनापरवानगी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींना गेटवर आल्यास सुरक्षा विभागाद्वारे प्रवेश दिला जाणार नाही. सदर बाबतीत संबंधित कर्मचाऱ्याने नातेवाईक येणार असल्याचे आपल्या विभागप्रमुखास अवगत करावे. त्यामुळे विभाग प्रमुखास सुरक्षा विभागास सूचना देणे सुलभ होईल. बाहेरून आलेल्या कर्मचारी, नातेवाईक यांनी वसाहतीमध्ये वावरताना सुरक्षिततेकरिता विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा आशयाचे परिपत्रक येथील मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी जारी केले आहे. त्यानुषंगाने त्यांनी गेट नंबर दोनवरील सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करून वीज केंद्राच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसह मेस्को व गार्डबोर्डच्या सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. यावेळी अधीक्षक अभियंता शशांक चव्हाण, वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापक लोंढे, सहायक सुरक्षा अधिकारी भामरे, देवरे, पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकelectricityवीजSocial Mediaसोशल मीडिया