शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी प्रचाराचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:21 IST

नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीला अखेरचे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पॅनलने प्रचाराचा झंझावात कायम राखला. रविवारी (दि.२३) होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच स्पर्धक पॅनल्सच्या उमेदवारांनी शहरात आणि आपापल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले.

नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीला अखेरचे काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पॅनलने प्रचाराचा झंझावात कायम राखला. रविवारी (दि.२३) होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच स्पर्धक पॅनल्सच्या उमेदवारांनी शहरात आणि आपापल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले.प्रगती पॅनलने शहरातील रामवाडीपूल ते निमाणी आणि सहकार पॅनलने नाशिकरोड व्यापारपेठेत फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. तसेच जिल्ह्णाच्या ग्रामीण भागात चांदवड, नांदगाव, लासलगाव येथे प्रचार केला. नम्रता पॅनलने तीन मोठ्या कारखान्यांच्या कामगारांना भेटून मतदानाचे आवाहन केले.तीन तुल्यबळ पॅनलच्या दावेदारीमुळे नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरली आहे. या बॅँकेसाठी तिन्ही पॅनल्सने बॅँकेच्या कार्यक्षेत्रांतील सर्व शहरे आणि तालुक्यात प्रचार केला. जिल्ह्यातच नव्हे तर अहमदनगर, जळगाव, पुणे-मुंबई तसेच सुरतसह अन्य जिल्ह्णांतदेखील प्रचार करीत सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा उडवून दिला. आता शहरावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून ज्या तालुक्याचे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांनी त्या त्या भागात प्रचार केला. सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलची प्रचाररॅली सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट येथून काढण्यात आली. तेथून गंगावाडी, रविवार कारंजा, मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, शालिमार, नेहरू गार्डन, महात्मा गांधीरोड, वकीलवाडी, अशोकस्तंभ, रविवार पेठ, मालेगाव स्टॅँड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, पेठफाटा, मखमलाबाद नाका, रामवाडीमार्र्गे निमाणी मंगल कार्यालय येथे येऊन तेथेच सांगता करण्यात आली. यावेळी पॅनलचे सर्व उमेदवार सहभागी झाले होते. व्यापाºयांना प्रचारपत्रके वाटप करून भूमिका पटवून देण्यात आली. यात हेमंत धात्रक, शिवदास डागा, प्रकाश दायमा, अविनाश गोठी, कांतीलाल जैन, महेंद्र बुरड, गणेश गिते, भानुदास चौधरी, हरिश लोढा, सुभाष नहार, नरेंद्र पवार, अशोक सोनजे, रंजन ठाकरे, प्रफुल्ल संचेती तसेच महिला राखीव गटातील उमेदवार शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, अनुसूचित जाती-जमाती गटातील उमेदवार प्रशांत दिवे आदी तसेच पॅनल समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होते. शनिवार (दि.२२) प्रचाराचा एक दिवस शिल्लक असला तरी प्रगती पॅनलने लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता मान्य करून प्रचाराची सांगता केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकBanking Sectorबँकिंग क्षेत्र