सटाणा : तापी नदीमधून वाळू चोरी सर्रास सुरूच आहे.या चोरट्या वाळूची वाहतूक करणार्या डंपर आता सटाण्याच्या महसूल यंत्रणेला चुकाविण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करतांना आढळून येत असून आज गुरु वारी (दि.15) बागलाण तहसीलदारांच्या भरारी पथकाने चिराई बारीत सापळा रचून वाळूचा ट्रक जप्त केला आहे. 2 लाख 78 हजार रु पयांचा दंड ठोठावला आहे.बागलाणच्या हद्दी मधून नाशिक, मुंबईकडे तापी नदीची चोरटी वाळू वाहतूक मोठ्याप्रमाणात होत आहे.या चोरट्या वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी तहसीलदार प्रमोद हिले यांनी कार्यभार हाती घेताच एका विशेष पथकाची निर्मिती करून छापा सत्र सुरु केले होते. त्यामुळे वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. दरम्यान गेल्या वर्षी तत्कालीन तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी चोरट्या वाळू वाहतूक करणार्या बारा डंपरवर कारवाई करून जिल्हात मोठी कारवाई केली होती.त्यानंतर यंदा पुन्हा तापीची चोरटी वाहतूक सुरु झाली असून या चोरीसाठी ग्रामीण मार्गांचा वापर सुरु असल्याचे महसूल यंत्रणेला आढळून आले आहे. आज गुरु वारी सकाळी चिराई बारीकडून चोरटी वाहतूक सुरु असल्याची माहिती तहसीलदार हिले यांना मिळाली होती. तहसीलदार हिले ,पुरवठा विभागाचे अधिकारी मोरे यांच्या पथकाने चिराई देवी मंदिरा जवळ सापळा रचला होता. यावेळी नंदुरबारहून अवैधरित्या वाळूने भरलेला ट्रक क्र मांक (एमएच 41 जी 6797) पकडण्यात आला. ट्रक मध्ये अडीच ते तीन ब्रास वाळू आढळून आली असून त्याचा पंचनामा करून 2 लाख 78 हजार रु पये दंड ठोठावला आहे.फोटो कॅप्शन ; बागलाण तालुक्यातील चिराई बारीत तहसीलदार प्रमोद हिले यांच्या पथकाने गुरु वारी पकडलेला वाळूचा ट्रक.
चिराई बारीत पकडला चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:52 IST
सटाणा : तापी नदीमधून वाळू चोरी सर्रास सुरूच आहे.या चोरट्या वाळूची वाहतूक करणार्या डंपर आता सटाण्याच्या महसूल यंत्रणेला चुकाविण्यासाठी ...
चिराई बारीत पकडला चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक
ठळक मुद्दे2 लाख 78 हजार दंड