शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तोंडावर तेजाब फेकून तलाक देण्याचा दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:38 IST

रंगीत साडीचा कारखाना वाढविण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करीत पैसे आणले नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकून तुला तलाक देईन अशी धमकी देणाऱ्या पती व सासरच्या चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव : रंगीत साडीचा कारखाना वाढविण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करीत पैसे आणले नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकून तुला तलाक देईन अशी धमकी देणाऱ्या पती व सासरच्या चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समा आफरीन सोहेल (२०), हल्ली रा. सनाउल्लानगर या विवाहितेने फिर्याद दिली. तिचा पती मोमेन सोहेल शकील अहमद, रा. अन्सारगंज आझादनगर याने पत्नी सना आफरीन हिने माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला घराबाहेर हाकलून दिले. सासरच्या लोकांनी शिवीगाळ करुन तिचे आईवडील पैसे देत नसतील तर तिला तलाक देऊन टाक अशी कानभरणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.उभ्या ट्रेलरला धडक मारुन पीकअपमधील तरुण ठारमालेगाव : मुंबई- आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल सिमला इन समोर कच्च्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागुन धडक मारुन पीकअप वाहनात बसलेल्या तरुणाच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या पीकअप चालकाविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इरफान मुस्तफा खाटीक (२४) रा. पारोळा, जि. जळगाव यांनी फिर्याद दिली. पीकअप (क्र. एम.एच. १९ बी.११२४) वरील चालक जयंत मगन चौधरी रा. धरणगाव याने मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगात वाहन चालवून रस्स्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या (क्र. एम.एच.०४. एच. वाय. ७२६१) ला पाठीमागुन धडक दिली. अपघात करुन पीकअपमध्ये बसलेला साक्षीदार रमेश सूर्यवंशी (३६) रा. धरणगाव, जि. जळगाव याच्या डोक्यास गंभीर दुखापतीस व त्याच्या मरणास व स्वत: व साक्षीदाराच्या नुकसानीस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहे.एरंडगावी महिलेस मारहाणंमालेगाव : तालुक्यातील एरंडगाव येथील महिलेच्या घरासमोरील बांधाच्या रस्त्यावर लघुशंका करीत असलेल्या जितेंद्र रामदास देवरे व त्याच्या तीन साथीदारांवर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मथुराबाई विठ्ठल देवरे (५०) रा. एरंडगाव शिवार शिंदे वस्ती यांनी फिर्याद दिली. फिर्यादीने जितेंद्र देवरे याला घरासमोर लघवी का करतो असे म्हटल्याचा राग येऊन त्याने अश्लील शिवीगाळ केला व फिर्यादीस काठीने मारहाण केली. अन्य तिघांनीही शिवीगाळ व मारहाण केली. झालेल्या झटापटीत सोन्याचे डोरले गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी