शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्र समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:11 IST

येवला तालुक्यातील सायगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या चार वर्षांपासून आरोग्यसेवक व सेविकेची नियुक्ती नसल्याने इमारत व प्रसूतीगृहाला मरणकळा सोसाव्या लागत आहे. इमारतीची झालेली पडझड व घाणीचे पसरलेले साम्राज्य यामुळे येथील आरोग्य उपकेंद्रच अखेरच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : सायगाव येथे आरोग्य कर्मचारी नसल्याने गैरसोय

सायगाव : येवला तालुक्यातील सायगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या चार वर्षांपासून आरोग्यसेवक व सेविकेची नियुक्ती नसल्याने इमारत व प्रसूतीगृहाला मरणकळा सोसाव्या लागत आहे. इमारतीची झालेली पडझड व घाणीचे पसरलेले साम्राज्य यामुळे येथील आरोग्य उपकेंद्रच अखेरच्या घटका मोजत आहे.पाच हजार लोकसंख्या असलेल्या सायगावमध्ये गेल्या तीस वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा सुरू होती. गरजेपुरती पुरेशी आरोग्य उपकेंद्राची इमारत, स्वतंत्र प्रसूतीगृह उभारण्यात आले आहे. पूर्वीपासून निवाशसी वैद्यकीय सेवक, नर्स यांचे वास्तव्य या इमारतीत असायचे. गेला चार वर्षांपूर्वी येथील आरोग्य सेविका सेवानिवृत्त झाल्या, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधींसह आरोग्य प्रशासनाने आरोग्य कर्मचारी नियुक्त केले नाही.येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत जीर्ण झालेली आहे. पावसाळ्यात गळणारे छत व कर्मचारी राहत नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या जीर्ण इमारतीला एक वर्षांपूर्वी रंगरंगोटी करून दुरुस्तीच्या नावाखाली लाख दोन लाखांचा निधी खर्ची करण्यात आला. त्यामुळे वरून कीर्तन आतून तमाशा अशीच गत सायगावच्या आरोग्य उपकेंद्र इमारची झाली आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून आरोग्यसेवकांची नेमणूक करण्यात यावी यासाठी वेळोवेळी ग्रामस्थांनी मागणी केली होती. ग्रामपंचायतीने येवला पंचायत समिती, जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करूनही अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही. याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीं यांची बेफिकिरी की, प्रशासनाची उदासीनता असा प्रश्न सायगावकरांना पडला आहे.प्रसूतीगृह धूळखात पडून !दहा वर्षांपूर्वी येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात स्वतंत्र प्रसूतीगृहाची इमारत बांधण्यात आली. आजपर्यंत या प्रसूतीगृहात एकाही महिलेची प्रसूती झाल्याची नोंद नाही. सुरवातीच्या दोन वर्षांत या प्रसूतीगृहात तलाठी कार्यालय थाटले होते. गेल्या चार वर्षांपासून निवासी वैद्यकीय सेवक नसल्याने या प्रसूतीगृहातील साधनसामुग्री धूळ खात पडून आहे. अस्ताव्यस्थ पडलेले सामान व भीती, छताला लागलेले जाळे, धूळ ही अनेक वर्षांपासून पडीत वास्तू असल्याची साक्ष देत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल