नाशिक : जिल्ह्णात कांद्याचे अमाप पीक आलेले असले तरी, त्याची वाहतूक करण्यासाठी पुरेशा रेल्वे वॅगन उपलब्ध होत नसल्याने लवकरच जिल्ह्णासाठी तीन रेल्वे वॅगन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या संदर्भात कांदा व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. जिल्ह्णात रेल्वेचे सात ते आठ स्थानके असून, या सर्व स्थानकांवर रेल्वे वॅगनची सुविधा होऊ शकते, मात्र त्या मानाने रेल्वेकडून वॅगन उपलब्ध होत नाही. सध्या जिल्ह्णात कांद्याचे पीक जोरात असून, व्यापाऱ्यांनी लिलावाद्वारे ते खरेदीही केले आहेत. परंतु अन्य राज्यांत त्याची वाहतूक करण्यासाठी पुरेशा वॅगन मिळत नसल्याने किमान पाच ते सात वॅगन दररोज उपलब्ध करून दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या भुसावळ मंडळचे महाव्यवस्थापकाशी चर्चा करून लवकरात लवकर तीन वॅगन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
कांद्यासाठी तीन वॅगन
By admin | Updated: February 17, 2017 00:43 IST