शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार दाव्यांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:33 IST

नाशिक जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्टÑीय लोकअदालत शनिवारी (दि.१४) भरविण्यात आली. या अदालतीमध्ये प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व अशा एकूण ३ हजार ३५५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

ठळक मुद्दे७ हजार ५५२ प्रलंबित प्रकरणे लोकन्यायालयात

नाशिक : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्टÑीय लोकअदालत शनिवारी (दि.१४) भरविण्यात आली. या अदालतीमध्ये प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व अशा एकूण ३ हजार ३५५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.नाशिक जिल्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत घेण्यात आली. यावेळी एकूण ७ हजार ५५२ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार २०३ प्रकरणांचा निपटारा झाला. यात धनादेश न वटल्याप्रकरणी ३००, फौजदारी ५१२, बँकेची ३६ प्रकरणे, मोटार अपघात ७८, कामगार विषयक ९, कौटुंबिक वाद ११५, भूसंपादन ९ आणि १४४ दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या लोकअदालतीत २ हजार १५२ दावा दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रसाद पी. कुलकर्णी यांनी यासाठी प्रयत्न केले.डिसेंबरमध्ये विशेष राष्ट्रीय लोकअदालतराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार येत्या १४ डिसेंबरला देशभरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त धनादेश न वटल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.‘महावितरण’वर आरोपबीएसएनएल व अन्य काही सहकारी बॅँकांच्या वादग्रस्त प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकअदालत भरविण्यात आली होती. यावेळी महावितरण कंपनीचा गलथान कारभार केला जात असल्याचा आरोप आयमा उद्योजक संघटनेने केला. चुकीच्या पध्दतीने ‘आयमा’ संस्थेला नोटीस बजावण्यात आल्याचे धनंजय बेळे यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय