शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्क अंतर्गत पहिल्या टप्प्यात तीन हजार प्रवेश

By admin | Updated: March 7, 2017 02:16 IST

नाशिक : शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आॅनलाइन अर्जांची पहिल्या टप्प्यातील सोडत सोमवारी (दि.६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात आली.

नाशिक : शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आॅनलाइन अर्जांची पहिल्या टप्प्यातील सोडत सोमवारी (दि.६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात आली. यात एकूण ६ हजार ६१५ प्राप्त अर्जांपैकी ३ हजार १३७ अर्जांची निवड झाली असून, या सोडतीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी २० मार्चला दुसऱ्या टप्प्यातील सोडत काढली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सोडत प्रक्रिया जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी राजीव म्हसकर व शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यांना इमरान सुल्तान यांनी तंत्रसाहाय्य केले, तर मनपा प्रतिनिधी जयंत शिंदे यांनी माहिती संकलन केले. यावेळी सोडत प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या पालकांनी दिनांक ६ ते १५ मार्च या कालावधीत शाळेत जाऊन प्रवेश घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. शिक्षण हक्क प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक शाळांध्ये जागा मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी पसंतीच्या कोणत्याही एकाच शाळेत प्रवेश घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या असून, शाळांनीही पालकांना अन्य शाळेत कागदपत्र दिली किंवा कसे याविषयी विचारणा करण्याचे निर्देश संबंधित शाळांना करण्यात आले आहे. तसेच अ‍ॅडमिट कार्डसोबत प्रवेश अर्जात दावा केलेल्या माहितीच्या पडताळणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रति शाळेत सादर करणे अनिवार्य असून, दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित प्रवेश रद्द समजून अशा विद्यार्थ्यांचा पुढील फेरीसाठीही विचार केला जाणार नाही. प्रवेशासाठी आवश्यक त्या सर्व दस्तऐवजांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)