शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा फेकून पळ काढणाऱ्या तिघा संशयितांना अटक, गुन्हे शोध पथकाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 15:17 IST

संजय शहाणे  लोकमत न्यूज नेटवर्क   नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाने वडाळा गावातील घोड्याच्या तबेल्यालगत सुमारे १७ ...

संजय शहाणे लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाने वडाळा गावातील घोड्याच्या तबेल्यालगत सुमारे १७ लाख रुपयाचा जायका १०००० रुपये कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना आढळून आल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांनी रोशन शेख, मोहम्मद गुफरान खान, शोएब पटेल या तिघा संशयितांना अटक केली आहे.

इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (दि.४) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास वडाळा गावातील घोड्याच्या तबेल्यालगत सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, मुश्रीफ शेख, सागर परदेशी, किशोर खरोटे, युवराज पाटील, योगेश जाधव, प्रभाकर पवार, सौरभ माळी, प्रकाश नागरे यांनी कारवाई केली. यावेळी घटनास्थळी सालाला रो हाऊसच्या पाठीमागे जायका दहा हजार कंपनीच्या गुटख्याचे पाकीट असलेल्या गोण्यांची ढीग दिसून आले.

पोलिसांनी या ठिकाणी आढळून आलेल्या रोशन अन्वर शेख ( २८ रा. वडाळगाव) याच्याकडे चौकशी केली. त्यात पोलिसांना आढळलेला गुटखा संशयित असद जाकीर सैय्यद याचा असून सैय्यद याने तो रोशन शेख व मोहम्मद गुफरान खान (रा. आलिशान सोसायटी वडाळा गाव), शोएब इक्बाल पटेल (३३) या तिघांनी मिळून फेकून दिल्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना गुटखा आढळून आल्याने या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघा संशयितांना अटक केली आहे. दरम्यान,  पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित रोशन शेख, मोहम्मद गुफरान खान, शोएब पटेल, या तिघांना अटक केली आहे. मात्र मुख्य संशयित असद जाकीर सैय्यद हा अजूनही फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.