शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

दसाणे येथे वाळूचे तीन ट्रॅक्टर जप्त

By admin | Updated: March 9, 2016 22:49 IST

दसाणे येथे वाळूचे तीन ट्रॅक्टर जप्त

बागलाण : पोलिसांची कारवाईसटाणा : बागलाण तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील दसाणे गावाच्या कान्हेरी नदीत मंगळवारी मध्यरात्री तीन वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे.महसूल विभागाची खरी जबाबदारी असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत सटाणा महसूल विभाग उदासीन असताना सटाणा पोलिसांनी मागील महिन्यापासून वाळूमाफियांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. इकडे सटाणा पोलीस ठाण्यात दिवसाआड पोलिसांची वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची यशस्वी कारवाई सुरू असली तरी, जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही खुलेआम वाळू उपसा सुरूच असल्याने या पोलिसांचे हात वाळूने ओले झाल्याची चर्चा आहे.दोन दिवसांपूर्वी लखमापूर येथे दोन वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करून गुन्हे दाखल केले असताना आज पुन्हा दसाणे येथील कान्हेरी नदी पात्रात तब्बल तीन ट्रॅक्टर वाळू उपसा करताना आढळून आल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे. हरी वसंत सोनवणे, मधुकर शंकर अहिरे व अनिल कडू सोनवणे, सर्व रा.दसाणे अशी या वाळूमाफियांची नावे असून, त्यांच्याकडून अनक्रमे फार्म ट्रेक कंपनीचा एमएच ४१ डी २१२८, एमएच ४१ डी ८८११ व बिगर नंबर ट्रॅक्टर असे तीन ट्रॅक्टर जोडलेल्या तीन ट्रॉल्यांसह वाळू भरलेल्या अवस्थेत पोलिसांनी जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.