शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल

By admin | Updated: January 29, 2017 01:17 IST

दुसरा दिवस : आज सुटीच्या दिवशीही अर्ज स्वीकृती

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्व विभागात दोन, तर पंचवटी विभागात एक याप्रमाणे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. रविवार (दि.२९) सुटीच्या दिवशीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.२७)पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच मौनी अमावस्या आल्याने मुहूर्तावर अर्ज दाखल करू पाहणाऱ्या उमेदवारांची पंचाईत झाली. त्यामुळे सहाही विभागांत एकही अर्ज दाखल झाला नाही. शनिवारी (दि.२८) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४ मधून दोन, तर पंचवटीतील प्रभाग क्रमांक २ मधून एक उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या सोयीसाठी रविवारी (दि.२९) सुटीच्याही दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची व्यवस्था ठेवली आहे. अद्याप राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर न केल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आलेली नाही. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी राजकीय पक्षांकडून पहिली यादी घोषित केली जाण्याची शक्यता असून, प्रामुख्याने, मंगळवारी (दि. ३१) गणेश जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)