शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

लढतीत तिघे, पण सामना दुरंगीच

By admin | Updated: November 15, 2016 01:02 IST

लढतीत तिघे, पण सामना दुरंगीच

 दत्ता महाले येवलायेवला नगरपालिका निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी शिवसेना, कॉँग्रेस व अपक्ष हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात भाजपा, सेनेला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. कॉँग्रेसचेही अल्प बळ असल्याने कॉँग्रेस उमेदवाराची केवळ हजेरी आहे. मात्र या प्रभागात खरी लढत शिवसेना आणि मातब्बर अपक्ष यांच्यात रंगणार आहे.या प्रभागात विद्यमान नगरसेवक पद्मा सुनील शिंदे (अपक्ष), सुनीता संजय वाळुंज (शिवसेना), सविता राजेंद्र गणोरे (कॉँग्रेस) हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या प्रभागात नगरसेवक पद्मा शिंदे यांनी ११ अ मधून निवडणूक लढवण्याचा इरादा महिन्यापूर्वीच व्यक्त केला होता. युतीच्या जागावाटपात प्रभाग ११ अ ची जागा शिवसेनेला सुटली.अर्थकारणाचा बळी जाण्यापेक्षा थांबणे बरे अशा विचाराने या प्रभागात प्रारंभी इच्छुक उमेदवार सापडत नव्हता. यवतमाळ जिल्ह्यातून सेनेची आमदारकीत दराडे बंधूंचे लक्ष केंद्रित झाल्याने शिवसेनादेखील ही जागा रिक्त सोडते काय, अशी चर्चा असतानाचा नरेंद्र दराडे यांनी त्यांचे समर्थक सुनीता संजय वाळुंज यांना शिवसेनेची उमेदवारी दिली. प्रथमदर्शनी एकतर्फी वाटणाऱ्या या प्रभागातील निवडणुकीत शिवसेनेचे नेते नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांनी दिलेल्या उमेदवारामुळे मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याची चर्चा प्रभागात आहे. शिवसेना नेते किशोर दराडे यांचे निवासस्थान या प्रभागात आहे. अपक्ष उमेदवार विद्यमान नगरसेवक पद्मा शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या या प्रभागात शिवसेना सारी शक्ती पणाला लावत उमेदवार सुनीता वाळुंज यांच्या पंखात बळ भरण्याचे काम करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचा उमेदवार गौण आहे. परंतु खरी लढत तर शिंदे आणि दराडे अशी असल्याचे प्रभागात बोलले जाते.पद्मा शिंदे यांनी मागील पाच वर्षाच्या कालावधीत नागरिकांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित केले होते. सुनील शिंदे यांचे जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून योगदान महत्त्वपूर्ण आहे. शिंदे यांनी प्रभागात टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला आहे. शिंदे यांना मानणारा वर्ग या भागात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवारी करून त्यांनी शहरात सर्वाधिक २८६१ मते मिळवून विजय संपादन केला होता. यावेळी राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ केली होती. पद्मा शिंदे यांनी ही उमेदवारी नाकारली असली तरी राष्ट्रवादी कॉँग्रेसने या प्रभागात उमेदवार दिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिंदे यांना समर्थन असल्याचा संदेश प्रभागात गेला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने ही खेळी करीत भाजपाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.आगामी विधानसभेकडे बारकाईने लक्ष असलेले शिवसेना नेते नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांचे निवासस्थान असलेला हा प्रभाग ११ आहे. या प्रभागात भाजपाने आपल्या वाट्याला आलेल्या जागेवर शहर अध्यक्ष आनंद शिंदे यांच्या पसंतीचा उमेदवार प्रभाग ११ ब मैदानात उतरवला आहे, तर शिवसेनेने सुनीता वाळुंज यांना उमेदवारी दिली आहे. पक्षनिष्ठेपेक्षा नेत्याच्या पसंतीचा उमेदवार या प्रभागात आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. यामुळे दराडे आपल्या समर्थक शिवसेना उमेदवाराचे काम किती सक्षमतेने करतात, भाजपा आणि सेना युती या प्रभागात अभेद्य राहते काय, भाजपा आणि सेना मनापासून या प्रभागात एकमेकांना साथ करणार काय यावर शिवसेना उमेदवार सुनीता वाळुंज यांची भिस्त आहे. येवला मर्चंट बँकेच्या संचालकपदावरदेखील पद्मा शिंदे काम करतात. भाजप सेनेच्या या बालेकिल्ल्यात शिंदेचे गेल्या पाच वर्षापासून निर्विवाद वर्चस्व आहे. हे मान्य करावे लागेल. संजय वाळूंज यांचा असलेला व्यावसाईक जनसंपर्क, बुरु ड गल्लीसह परिसरात त्यांचा वावर ,आण िदराडेबंधू यांचा सक्र ीय सहभाग हि वाळूंज यांची बलस्थाने आहेत.कॉँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले राजेंद्र गणोरे यांच्या पत्नी सविता गणोरे या प्रभागातून उमेदवारी करीत आहेत. यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने नसलेले स्वबळ आजमावत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत १५ जागांवर उमेदवार उभे केले. या सर्व उमेदवारांना पक्षाच्या वतीने अर्थपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन कॉँग्रेसने दिले आहे. त्यामुळे उमेदवार किमान प्राथमिक खर्च करीत कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. कॉँग्रेस उमेदवारांना पक्षश्रेष्ठींकडून अर्थपूर्ण मदतीची अपेक्षा आहे. ही मदत थेट आपल्यापर्यंत यावी अशी अपेक्षा उमेदवारांना आहे. ही रसद थांबली तर उमेदवार शहरात शोधूनदेखील सापडणार नाहीत. सेनेच्या सुनीता वाळुंज आणि कॉँग्रेसच्या सविता गणोरे हे दोन्ही उमेदवार सर्वसामान्य नागरिकांशी सध्या संपर्क करताना दिसत आहेत. यंदा निवडून दिले तर प्रभागातील मुलभूत समस्यांच्या मुद्द्यावर मतदारांना गळ घालत आहे. प्रभागात काँक्रि टीकरण, मुबलक पाणी, पथदीप व्यवस्था, यांच्यासह समाजपयोगी बाजू नगरपालिकेत मांडून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्परतेणे काम करण्याचे आश्वासन सर्व सामान्य मतदारांना देत असल्याचे चित्र प्रभागात आहे.