शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दीड तासात तीन मंगळसूत्र ओरबाडले : सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 21:31 IST

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने सोनसाखळी ओरबाडून पळ काढण्याच्या घटना घडत असल्यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (दि.३) भर दुपारी अवघ्या दीड तासात गंगापूररोड, आडगाव, डीजीपीनगर या तीन भागांमध्ये लागोपाठ घडलेल्या घटनांमध्ये एकूण साडेसात तोळे सोने चोरट्यांनी हातोहात हिसकावून पोबारा करत पोलिसांना आव्हान दिले आहे.नाशिककरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी ...

ठळक मुद्देगुरुवारी दीड तासात घडलेल्या तीन सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पोलिसांची नाकाबंदी आणि त्याचा दर्जा चव्हाट्यावर साडेसात तोळे सोने चोरट्यांनी हातोहात हिसकावून पोबारा करत पोलिसांना आव्हान दिलेगंगापूररोड, आडगाव, डीजीपीनगर या तीन भागांमध्ये लागोपाठ घडलेल्या घटनांसातत्याने सोनसाखळी ओरबाडून पळ काढण्याच्या घटना

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने सोनसाखळी ओरबाडून पळ काढण्याच्या घटना घडत असल्यामुळे महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (दि.३) भर दुपारी अवघ्या दीड तासात गंगापूररोड, आडगाव, डीजीपीनगर या तीन भागांमध्ये लागोपाठ घडलेल्या घटनांमध्ये एकूण साडेसात तोळे सोने चोरट्यांनी हातोहात हिसकावून पोबारा करत पोलिसांना आव्हान दिले आहे.नाशिककरांचा बुधवारचा दिवस सोनसाखळी चोरीने जणू सुरू झाला होता. केवळ वीस मिनिटांत ओरबाडून नेलेल्या दोन सोनसाखळी चोरीच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा गुरुवारी दीड तासात घडलेल्या तीन सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पोलिसांची नाकाबंदी आणि त्याचा दर्जा चव्हाट्यावर आणून ठेवला आहे. त्याचप्रमाणे पोलीस गस्तीविषयीदेखील सर्वसामान्यांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे.

शहरात सातत्याने होणारी नाकाबंदी, वाहतूक पोलिसांकडून वसूल केला जाणारा दंड, गुन्हे शाखेकडून सोनसाखळी चोरट्यांच्या आवळल्या जाणाºया मुसक्या अशा कारवाया सुरू असतानाही सोनसाखळी चोरट्यांचे धाडस अद्याप कमी झालेले नाही. गंगापूररोडवरील एका ६६ वर्षीय मीना सुभाष साखला घरकाम करणाºया महिलेसोबत व्हीलचेअरवरून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कॉलनीमध्ये फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी समोरून येत महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोनसाखळी घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यांचा मुलागा स्वप्नील साखला यांच्या फिर्यादीवरून गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना कोणार्कनगर परिसरात घडली. सुनंदा बडगुजर (५५) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून येत अशाच पद्धतीने चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. विशेष म्हणजे बडगुजर या एकट्या रस्त्याने जात नव्हत्या तर त्यांच्यासोबत तीन ते चार महिला होत्या तरीदेखील चोरट्यांनी धाडस केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तिसरी घटना डीजीपीनगर क्रमांक १ परिसरात मंदिराजवळ घडली. उषा सत्पालसिंग चव्हाण (५१) दूध घेण्यासाठी पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली.