शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तीन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:06 IST

शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरूच असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डीरोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

नाशिक : शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरूच असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डीरोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास जेलरोडच्या कॅनॉल रोड परिसरात घडली़ पंचगंगा हौसिंग सोसायटीतील धमेंद्र अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारच्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील बेडरूममध्ये ठेवलेले पाऊण लाखाचे दागिने चोरून नेले़ यामध्ये पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व २० हजार रुपयांच्या नेकलेसचा समावेश आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात घरफोडीची दुसरी घटना शनिवारी (दि़ १६) घडली़ संगीता तारगे (रा़ श्रद्धा बंगला, पोस्टआॅफिसशेजारी, सावरकरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बबिता ऊर्फ बेबी ज्ञानेश्वर कासार हिने तारगे बंगल्यातील बेडरूममध्ये प्रवेश करून ओम आकाराचे सोन्याचे लॉकेट व सोन्याची चेन असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिसरी घटना वडाळा-पाथर्डी रोडवरील विनयनगरलगत असलेल्या कालिका पेट्रोलपंप परिसरात मंगळवारी (दि़१९) घडली़ सुनील शिंदे (रा़ उज्ज्वल बंगला, संत नामदेव सोसायटीशेजारी, विनयनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या जिन्याजवळील लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला़ तसेच बेडरूममधून पलंगावर असलेला दहा हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल फोन चोरून नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़भाडेकरूची माहिती न देणाऱ्या घरमालकावर गुन्हाघर भाडेतत्त्वावर देऊन त्यातील भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना न देणाºया फ्लॅटमालकावर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ परशराम रामदास साबळे (रा़ वणी, ता. दिंडोरी) असे गुन्हा केलेल्या घरमालकाचे नाव आहे. साबळे यांचा पांडवनगरीतील जनगौरव इमारतीतील फ्लॅट नंबर ४१४४ (ए विंग) मध्ये १५ नंबरचा फ्लॅट आहे़ हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले मात्र त्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना दिलीच नाही़ या प्रकरणी पोलीस शिपाई ताहीर शेख यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय