सिडको : अंबड पोलिसांनी एका संशयितासह विधीसंघर्षित बालकाकडून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यामध्ये दुचाकी, सोन्याच दागिने व गृहोपयोगी वस्तुंचा समावेश आहे़अंबड पोलिसांनी संशयित सौरभ राजेंद्र ढगे व एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले होते़ त्यापैकी ढगेकडून पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली पल्सर दुचाकी (एमएच १५, डीआर ४६३८), मनमाड पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली नंबर नसलेली पल्सर दुचाकी व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेली नंबरप्लेट नसलेली विक्रांता दुचाकी असा दोन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ ढगेबरोबरच ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षित बालकाकडून तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, दीड ग्रॅमचे कर्णफुले, सॅमसंग कंपनीचा टीव्ही, २८ साड्या, १४ टॉवेल, ४० टॉप्स, ३ टी शर्ट, १९ ड्रेस मटेरियल, सीटी -१०० दुचाकी असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ हा ऐवज या चोरट्याने अंबड व इंदिरानगर परिसरातून चोरला होता़ पोलिसांनी या दोघाही संशयितांना ताब्यात घेतले आहे़ (वार्ताहर)
दोन संशयितांकडून तीन लाखांचा माल जप्त
By admin | Updated: October 24, 2016 00:54 IST