शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तीन लाख विद्यार्थ्यांना सुट्टीतही मिळणार आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:52 IST

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बारा तालुक्यांसाठी उपाययोजना : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी नियोजन

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील नागरिकांपुढे पाणी आणि अन्नाचा मोठा प्रश्न आहे. निदान विद्यार्थ्यांच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठी शाळेला सुटी असतानादेखील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या दुष्काळी भागातील शाळांमधील विद्यार्थी तसेच देवळा, इगतपुरी, नाशिक आणि चांदवड या टंचाईसदृश तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शाालेय पोषण आहार पुरविला जाणार आहे. कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला या तालुक्यांमधील काही गणांमधील गावे दुष्काळी असल्याने त्यांनादेखील पोषण आहार पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.या योजनेत आठ तालुक्यांमधील शंभर टक्के विद्यार्थ्यांना आहारासाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर उर्वरित कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला येथील काहीच शाळांमधील विद्यार्थी लाभार्थी ठरणार आहेत. बागलाणमधील ३८० शाळांमधील (४४,२७७), मालेगाव ४१८ शाळांमधील (७८,४४९), नांदगाव येथील २८५ शाळांमधील (३६,९४१), सिन्नरमधील २६५ शाळांचे (३८,७४०), देवळा तालुक्यातील १५२ शाळांमधील (१८,८६३), इगतपुरी तालुक्यातील २६७ शाळांचे (३१,३७०), नाशिक तालुक्यातील १३५ शाळांमधील (२०,९३३), चांदवडमधील २४० शाळांचे (२९,४३१), कळवणमधील ११५ शाळांचे (१२,५५७), दिंडोरी तालुक्यातील ५० शाळांमधील (७७७९), निफाड तालुक्यातील १८१ शाळांमधील (२९,१८८) तर येवला येथील २४१ शाळांमधील (२३,०३२ विद्यार्थ्यांना) शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र धरण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शाळेच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही एका शिक्षकाला शाळेत येऊन मुलांना खिचडी देण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. किती मुलांना खिचडी देण्यात आली याची नोंददेखील घेण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच इतर मुले आले तरी त्यांनादेखील खिचडी देण्यात यावी, असेदेखील सुचविण्यात आले आहे.अतिरिक्त तांदळाची तरतूदनाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त टंचाईसदृश भागातील शाळांमध्ये पात्रविद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याकरिता अतिरिक्त तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. सदर तांदूळ नियतन उचल करून तत्काळ शाळांनावाटप करण्यात यावे, तसेच तांदूळ व्यपगत झाल्यास व दुष्काळात तांदूळअपुरा पडल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.