शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

नांदगावनजीक अपघातात तीन ठार

By admin | Updated: September 7, 2014 00:39 IST

नांदगावनजीक अपघातात तीन ठार

नांदगाव : शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळील वळणावर शनिवारी सायंकाळी दोघा दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.नांदगाव येथील देवी गल्लीत राहारा लखन जावरे (२६) तसेच मालेगाव कॅम्पातील रावळगाव नाका येथे राहणारे लक्ष्मण एकनाथ शेवाळे (४५) व त्यांची मुलगी स्नेहल (१४) जागीच गतप्राण झाले, तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत. प्रत्येक दुचाकीवर एकूण तीन जण प्रवास करत होते.साकोरे येथील आजारी असलेल्या नातेवाइकास भेटून मालेगावकडे परतत असताना लक्ष्मण शेवाळे व त्यांच्या मुलीवर काळाने घाला घातला. शेवाळे यांची पत्नी लीलावती यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत तर लखन बरोबरचे इतर दोघे मित्र राहुल सुकदेव सोनवणे (३०) व भारत सुनील शेलार (२६) हेदेखील गंभीर जखमी आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मालेगावला हलविण्यात आले आहे.वस्तीशाळा शिक्षक प्रकल्प पाटील आपल्या आजारी आईला मालेगावकडे दुचाकीवरून घेऊन जात असताना त्यांच्या समोरच हाअपघात झाला. हे दृश्य बघून भांबावलेले पाटील यांना सुरुवातीस काहीच सुचेना. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखत लगेच त्यांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांच्याकडे मोबाइलवरून रुग्णवाहिकेची मागणी केली. डॉ. बोरसे यांनी तत्काळ प्रतिसाद देत रुग्णवाहिका घटनास्थळी धाडली.मयत शेवाळे मालेगाव तालुक्यात अजंग वडेल येथे प्राथमिक शिक्षक होते. मुलगी व वडीलांच्या मृत्यूमुळे नांदगाव व मालेगावच्या शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पाटील व त्यांच्या सहकार्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. (वार्ताहर)’ मुंबई : राज्य सरकारने शनिवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पी.के.देशमुख हे रोेजगार हमी योजना आणि जलसंवर्धन विभागाचे नवे सचिव असतील. वनामती; नागपूरच्या महासंचालक विनिता वेद आयसीडीसी; नवी मुंबईच्या नवीन आयुक्त असतील.मनरेगाचे आयुक्त एम.शंकरनारायणन हे वनामती; नागपूरचे नवे महासंचालक असतील. (प्रतिनिधी)