नाशिक : जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला मार्च एण्डच्या लगीनघाईत शुक्रवारी (दि.३१) ३५ कोटींचा निधी सायंकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर शुक्रवारी दिवसभरात ७२ कोटी ५८ लाखांची सुमारे १२५ देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाला रस्ते व पुलांच्या कामांसाठी २० कोटी, तर लघुपाटबंधारे विभागाला बंधाऱ्यांच्या कामासाठी १५ कोटींचा निधीही अखेरच्या दिवशी प्राप्त झाल्याचे कळते. बुधवार व गुरुवारी दोन दिवसांत ४१ कोटींचा निधी विविध विकासकामांसाठी प्राप्त झाला होता. दोन दिवसांत जिल्हा परिषदेला एकूण ५९ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे २९ व ३० मार्च या दोन दिवसांत सुमारे १६ कोटींची २२० देयके जिल्हा कोशागार कार्यालयात सादर करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे होते. २९ मार्च रोजी जिल्हा परिषदेला १८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. गुरुवारी (दि.३०) जिल्हा परिषदेला शासनाकडून ४१ कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यात ग्रामपंचायत विभागाला २० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या दिवशी सुमारे १२ कोटींची १५० देयके जिल्हा कोशागार कार्यालयास सादर करण्यात आली होती. गुरुवारी (३०) सुमारे ४ कोटींची ७० देयके जिल्हा कोशागार कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसांत जिल्हा परिषदेला एकूण ५९ कोटींचा निधी प्राप्त झाला होता, तर दोन दिवसांत एकूण १६ कोटींची २२० देयके जिल्हा कोशागार कार्यालयास सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. शुक्रवारी (दि.३१) मार्चअखेरच्या शेवटच्या दिवशी आधीची १६ कोटींचे देयके आणि शुक्रवारी दिवसभरात ७२ कोटींची देयके पाहता एकूण शंभर कोटींच्या आसपास रक्कमेची देयके जिल्हा कोशागार कार्यालयास सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तीन दिवसांत शंभर कोटींची साडेतीनशे देयके
By admin | Updated: March 31, 2017 23:29 IST