शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

तीघा सोनसाखळी चोरांभोवती आवळला ‘मोक्का’चा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 19:35 IST

आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत.

ठळक मुद्दे७ लाख ४७ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या ९लगड जप्त जबरी चोरीसारखे गुन्हे वारंवार करणा-या त्रिकुटांवर मोक्का

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून फरार होणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने काही दिवसांपुर्वी आवळल्या. सराईत गुन्हेगार सोमनाथ हिरामण बर्वे (३०,रा.मातोरी), नितीन निवृत्ती पारधी (२५,रा.फुलेनगर) आणि अनिल भाऊराव पवार (२३,रा.सय्यद पिंप्री) या त्रिकुटांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महाराष्ट्र  संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. चंदन चोरट्यांच्या टोळीनंतर शहरात सोनसाखळी चोरट्यांवर मोक्काची ही दुसरी कारवाई आयुक्तालयाकडून करण्यात आली.आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि सोनसाखळ्या हिसकावणा-या गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण व्हावा, या उद्देशाने नांगरे पाटील यांनी संघटितपणे जबरी चोरीसारखे गुन्हे वारंवार करणा-या या त्रिकुटांवर मोक्का लावला आहे. या त्रिकु टांपैकी दोघांनी मिळून २३ एप्रिल २०१९ रोजी औरंगाबाद रोडवरील एका लॉन्स समोरून पायी जाणा-या स्वाती विजय परमेश्वर (रा. पुणे) यांच्या गळ्यातील सुमारे साडे चार तोळे वजनाचे ७२ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून पेठ फाटा परिसरातून सोमनाथ बर्वे आणि नितीन पारधी यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्या दोघांना ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर त्यांनी त्यांचा सय्यद पिंप्रीमध्ये राहणारा साथीदार अनिल भाऊराव पवारच्या मदतीने शहरासह ग्रामीण भागात सुमारे नऊ जबरी चो-या केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याविरोधात यापुर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.स्पोर्टस् बाइकवरून ‘रॉबरी’त्रिकुटांकडून ७ लाख ४७ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या ९लगड जप्त केल्या आहेत. या टोळीचा प्रमुख नितीन पारधी हा सोनसाखळी ओरबाडण्यासाठी स्पोर्टस बाईकचा वापर करत होता. संघटीतपणे गुन्ह्यांचे कट रचून शहरासह ग्रामीण भागात या त्रिकुटांनी महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावण्यासाचा सपाटा लावला होता. त्यामुळे संघटित गुन्हेगारी संपविण्यासाठी नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी त्रिकुटांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का प्रस्तावित केला. त्यास मंजुरी मिळाली असून त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकChain Snatchingसोनसाखळी चोरी