शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:43 IST

पेठ : तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या एकाच कुटूंबातील तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून दुर्देवी अंत झाला. यामध्ये दोन सख्ख्या बिहणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पेठ : तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या एकाच कुटूंबातील तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून दुर्देवी अंत झाला. यामध्ये दोन सख्ख्या बिहणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत अधिक माहीती अशी की, निशा पंढरीनाथ किलिबले (९ वर्षे रा. उभीधोंड), योगिता पंढरीनाथ किलिबले (१२ वर्षे, रा उभीधोंड) व पुनम संतोष बोके (१३वर्षे रा अंबापुर) या तिघी बुधवारी ( दि.१३) दुपारच्या सुमारास खंबाळे शिवारातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असतांना खोल पाणी व गाळ याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागल्या. एकमेकींना वाचवण्याच्या नादात तिघींना आपला जीव गमवावा लागला. काठावर असलेल्या एका मुलीने आरडा ओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. याबाबत पेठ पोलीसांनी मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी भेट देऊन तिन्हही मुलींचे मृतदेह बाहेर काढले.पेठ येथील ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृतांपैकी योगिता व निशा या दोन सख्ख्या बिहणी असून निशा ही अंबापूरच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत तर योगीता व पूनम ह्या पेठ येथील जनता विद्यालयात अनुक्र मे सहावी व सातवीत शिक्षण घेत होत्या. याबाबत पेठ पोलीसात अकिस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सद्या लॉक डाऊन आणी शाळांना सुटया असल्याने अंबापूर येथील नामदेव बोके यांच्या उभिधोंड येथील मुलीच्या दोन मुली व मुलाची एक मुलगी अशा तीन नाती एकाच दिवशी मयत झाल्याने बोके कुटूंबीय पूर्णता कोलमडून गेले आहे. कालच मामाच्या गावी आलेल्या दोन्ही संख्या बहिणींचा अंत झाल्याने ऊभिधोंड येथील किलिबले परिवारात दु:खाची छाया पसरली आहे.-----------------------------अधिकाऱ्यांची घटनास्थळी धावघटनेची माहीती मिळताच तहसीलदार संदिप भोसले, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत झालेली गर्दी पांगवतकुंटूंबियांना धीर दिला.एकाच कुंटूबातील तीन मुलींचा असा दारूण अंत झाल्याने बिहण भावासह बोके व किलिबले कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक