मालेगाव : शहरातील कमालपुरा भागात जनावराची कत्तल केल्याप्रकरणी विशेष पोलीस पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ९८ हजार २५० रुपये किमतीचे एक हजार ३१० किलो जनावरांचे कत्तल केलेले मांस व वाहनासह ५ लाख ९८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी शेख रमजान शेख सुफान (३४), अर्शदखान रशीदखान दोघे रा. कमालपुरा, शेख मजीद शेख जहाँगिर रा. फार्मसी कॉलेजजवळ या तिघांना अटक केली. अधिक तपास पोलीस नाईक अहिरे करीत आहेत.
जनावराच्या कत्तलीप्रकरणी मालेगावी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:24 IST