शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विभागात तीन महिन्यांत ४४ मृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 02:01 IST

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकताच या संदर्भातील आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला असता विभागात ४४ जणांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे वारसांना आर्थिक मदतही करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : आयुक्तांनी घेतला आढावाू

नाशिक : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकताच या संदर्भातील आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला असता विभागात ४४ जणांचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे वारसांना आर्थिक मदतही करण्यात आलेली आहे.सलग दहा दिवस झालेल्या पावसाचा फटका सर्वत्र बसला. नाशिकबरोबरच धुळ्यालादेखील पावसाचा तडाखा सहन करावा लागला. नंदुरबार, जळगाव आणि नगरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भिंत कोसळून, पुरात वाहून तसेच वीज पडून मृत पावलेल्यांचा यात समावेश आहे. गेल्या सोमवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पाचही जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन सरकारी मदत आणि उपाययोजनांची माहिती घेतली. (पान ३ वर)ेविभागात तीन महिन्यांत ४४ मृत्यू(पान १ वरून)जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत विभागात सर्वत्र कुठे ना कुठे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्णाची संख्या सर्वाधिक आहे. नैसर्गिक आपत्तीतील विविध कारणांमुळे एकूण १३ जण प्राणास मुकले आहेत. तर धुळे आणि नंदुरबार येथे १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. जळगाव तसेच नगर येथे अनुक्रमे ५ आणि २ इतके लोक मृत्युमुखी पडले. शाासनाच्या आपत्ती नियमाप्रमाणे संबंधित मयतांच्या वारसांना नियामानुसार देण्यात येणारी मदत देऊ करण्यात आलेली आहे. विभागातून सुमारे १०४ लाखांची मदत मयतांच्या वारसांना देण्यात आलेली आहे.विभागातील ४४ प्रकरणांमधील ३४ प्रकरणे पात्र करण्यात आली, त्यापैकी २६ प्रकरणांमध्ये संबंधितांच्या वारसांना मदत करता आली. नाशिक जिल्ह्णातील १३ प्रकरणांपैकी ८ प्रकरणे पात्र धरण्यात आली. तर धुळे येथील सर्वच्या सर्व १२ प्रकरणे मंजूर झाली. धुळ्यातील १० तर जळगाव आणि नगर येथील प्रत्येकी २२ प्रकरणे मंजूर करण्यात आली किंबहुना त्यांना मदतीसाठी पात्र धरण्यात आले. नगर आणि धुळ्यातील सर्व प्रकरणे मंजूर करण्यात आले, मात्र नाशिकमधील सर्वाधिक प्रकरणांना कात्री लावण्यात आली.—इन्फो—पात्र प्रकरणांना आर्थिक मदतविभागात मयत झालेल्या ४४ प्रकरणांपैकी ३४ प्रकरणे पात्र करण्यात आली तर २६ प्रकरणांमधील बाधितांना आर्थिक मदत देण्यात आली. नाशिकमधील ८, धुळे येथील ५, नंदुरबार येथील ९, जळगाव येथील २ तर अहमदनगर येथील २ प्रकरणांना मदत करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcommissionerआयुक्तDeathमृत्यू