नाशिक : महापालिकेमार्फत शहरातील सहाही विभागांत सुमारे २१ हजार वृक्षांची लागवड करण्यासंबंधी करारनामा करूनही लागवडीस नकार देणाऱ्या तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. महापालिकेने आता नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून, आॅगस्टअखेरपर्यंत कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक महेश तिवारी यांनी दिली. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहरात सहाही विभागात २१ हजार वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम आखला होता.
तीन ठेकेदार काळ्या यादीत
By admin | Updated: August 20, 2016 01:27 IST