मालेगाव : शहरातील नवीन बसस्थानकानजीक पेट्रोलपंपामागे बोळीत विनापरवाना बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेली तीन जनावरे शहर पोलिसांनी जप्त केली. अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक राहुल गांगुर्डे यांनी फिर्याद दिली. अज्ञात इसमाने बारा हजार रुपये किमतीची तीन जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत. (प्रतिनिधी)
कत्तलीसाठी बांधून ठेवलेली तीन जनावरे जप्तं
By admin | Updated: October 16, 2015 23:06 IST