शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथे तीन घरफोडीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:07 IST

देवळा : घरातील माणसे बाहेरगावी गेली असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना देवळा येथे घडली. घरातील माणसे परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दाराचा कोयंडा तोडून एकाच रात्री तीन घरे फोडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदिवाळीतील बंद घरांमुळे चोरट्यांना मैदान मोकळे

देवळा : घरातील माणसे बाहेरगावी गेली असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना देवळा येथे घडली. घरातील माणसे परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दाराचा कोयंडा तोडून एकाच रात्री तीन घरे फोडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.शहर व उपनगरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असुन अद्यापपर्यंत शहारात सी.सी.टिव्हि कॅमेरे बसविलेले नसल्याने नागरीकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.२९ आॅक्टोबर रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान देवळा शहरातील आयडीयल इंग्लिश स्कुलचे संचालक गोरख रतन अहेर यांच्या शाळेच्या कार्यालयाचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपयांची रोकड चोरून नेली.ह्याच परीसरातील रिहवासी हनुमंत काशिनाथ आहीरे यांच्या घराचा दरवाजा तोडून २० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. शिवाजीनगर येथे राहणारे सेवानिवत्त प्राध्यापक आर. के. पवार हे बुधवारी पत्नीसह बाहेर गेले होते. रात्री घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलुप तोडले. मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडुन आत प्रवेश केला व कपाटातील दोन मोती, चांदीची भांडी असा सात हजार रूपयांचा ऐवज चोरीन नेल्याची माहिती प्रा. पवार यांनी दिली आहे.गोरख अहेर यांच्याकडे झालेल्या चोरीचे सी.सी. टि. व्ही. फुटेज प्राप्त झाले असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.शहरात ज्यष्ठ नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी हया घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. शहर व उपनगरांमध्ये सी.सी. टि. व्ही यंत्रणा त्वरीत बसविण्यात यावी व पोलिसांनी गस्त वाढवावी.- प्रा.आर.के. पवार ( सदस्य, ज्येष्ठ नागरीक. )शहर व परिसरातील गस्त वाढवून तिची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी शहरातील व उपनगरातील चौकांमध्ये हजेरी पुस्तक ठेवण्यात येणार असून गस्ती पथकातील कर्मचार्याने नियमतिपणे त्यात स्वाक्षरी करावयाची आहे.- सुरेश सपकाळे. (पोलिस निरीक्षक, देवळा. )