शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

संचालकासह तिघांना अटक

By admin | Updated: July 15, 2014 00:48 IST

संचालकासह तिघांना अटक

नाशिक : जिह्यासह मराठवाड्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लिमिटेडमध्ये संचालक बापूसाहेब छबू चव्हाण (रा़ श्रीजी रो-हाऊस, जत्रा हॉटेलमागे, नाशिक) यांच्यासह कंपनीचे व्यवस्थापक पंकज शिंदे व वाहनचालक नितीन शिंदे यांना सोमवारी दुपारी आडगाव पोलिसांनी अटक केली़ पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार फ सवणुकीची रक्कम २५ कोटींवर गेली असून, प्रमुख संशयित भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण अद्यापही फ रार आहेत़केबीसीचे मुख्य संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण हे सिंगापूरला पळून गेले असून, तिसरे संचालक बापूसाहेब बापू चव्हाण हे शहरातच असल्याची माहिती मोबाइल लोकेशनवरून पोलिसांना मिळाली़ सोमवारी दुपारी स्कॉर्पिओ (एमएच १५, डीएस ६८०४) वाहनातून बापू चव्हाण, कंपनीचे व्यवस्थापक पंकज राजाराम शिंदे (रा़ हिरावाडी) व वाहनचालक नितीन पोपटराव शिंदे हे नांदूर नाका परिसरातून जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली़मुंबई-आग्रा महामार्गावरील केबीसी मल्टिट्रेड प्रा़ लिमिटेड या कंपनीचे संचालक भाऊसाहेब बापू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बापूसाहेब छबू चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर जादा रकमेचे आमिष दाखविले़ सुरुवातीला गुंतवणूकदारांना पैसेही मिळाले; मात्र नंतर पैसे देण्याबाबत टाळाटाळ होऊ लागली़ याबाबत एकनाथ खैरनार यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर दिवसागणिक तक्रारदारांची संख्या वाढू लागली आहे़ दरम्यान, फ सवणुकीची रक्कम २५ कोटींच्या घरात पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़(प्रतिनिधी)