शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

साडे तीन हजार हेक्टर हरभरा पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:52 IST

पाटोदा :- हवामान बदलाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत असल्याने शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात आल्याने उत्पादनात निम्याने घट येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

पाटोदा :- हवामान बदलाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत असल्याने शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात आल्याने उत्पादनात निम्याने घट येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून तो पूर्णत: हवालदिल झाला आहे. मागील वर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन काढणीस आलेल्या खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असे असतांनाही शेतकरी वर्गाने नाउमेद न होता रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करीत , गहू, हरभरा,ज्वारी आदि पिकांची शेतात मोठया प्रमाणात पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली व पिकेही चांगली आली. मात्र त्यानंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या तीन महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने तसेच दव ,थंडी व उष्ण वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्व पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गाने विविध प्रकारची बुरशीनाशके,किटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्यासाठी प्रयत्न केले.आता हरभरा पिकाला फुलोरा लागला असून काही ठिकाणी घाटे लागले आहेत. मात्र हरभरा पिकावर अळीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.माव्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे तर अळी पाने व घाटे कुरतडले आहे.औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. अळी ही घाट्याच्या आतमध्ये जात असल्याने औषध फवारणीचा अळीवर परिणाम होत नाही.तसेच हवामानात दिवसातून तीन ते चार वेळेस बदल होत असल्याने पिकाचा बचाव कसा करावा ? असा यक्ष प्रश्न उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. या अळीमुळे हरभरा उत्पादनात निम्याने घट येणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक