शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

झनकरांच्या नावे तीन एकर जमीन अन‌् चार फ्लॅट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 01:36 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर (४५) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळ्यात पकडले; मात्र सूर्यास्तानंतर महिलेला कायद्याने अटक करता येत नसल्याने नातेवाइकांना समन्स देत सकाळी ताब्यात देण्याच्या हमीवर मध्यरात्री पथकाने त्यांची मुक्तता केली अन‌् हेच पथकाला भोवले. सकाळी त्या पुन्हा पथकाच्या ताब्यात आल्या नसल्याने त्यांना न्यायालयात फरार दाखविले गेले. पथकाने घरझडती घेतली असता त्यांच्या नावावर सुमारे तीन एकर जमीन आणि चार फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.

ठळक मुद्देघरझडती : ४० हजारांची रोकड अन‌् दोन वाहने

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर (४५) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळ्यात पकडले; मात्र सूर्यास्तानंतर महिलेला कायद्याने अटक करता येत नसल्याने नातेवाइकांना समन्स देत सकाळी ताब्यात देण्याच्या हमीवर मध्यरात्री पथकाने त्यांची मुक्तता केली अन‌् हेच पथकाला भोवले. सकाळी त्या पुन्हा पथकाच्या ताब्यात आल्या नसल्याने त्यांना न्यायालयात फरार दाखविले गेले. पथकाने घरझडती घेतली असता त्यांच्या नावावर सुमारे तीन एकर जमीन आणि चार फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी लाचखोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी झनकर यांना ताब्यात घेतले होते. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चौकशीनंतर त्यांना नातेवाइकांच्या हमीवर पथकाने सोडले आणि सकाळी पुन्हा हजर होण्याचे निर्देश दिले; मात्र त्यांनी सकाळी पथकाला गुंगारा देत शहरातून काढता पाय घेतला. पथकाने शासकीय मोटारचालक ज्ञानेश्वर सूर्यभान येवले (४९), प्राथमिक शाळेतील शिक्षक पंकज रमेश दशपुते (३८) यांच्याही घराची झडती घेतली.

झनकर यांच्या नावे शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट तसेच सिन्नरमध्ये ०.५७ गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये ३१.७० गुंठे, १०.८ गुंठे,४०.८० गुंठे, १३.१०गुंठे तर सिन्नर येथे ०.५६ गुंठे, ३.४१ गुंठे, २२.७० गुंठे, अशी एकूण सुमारे १२३.६४ गुंठे अर्थात सुमारे ३ एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. तसेच ४० हजारांची रोख रक्कम, एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहने सापडली. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनीयन बँक, पंजाब नॅशनल बँकेसह आदी बँकांचे पासबुक पथकाने ताब्यात घेतले आहे.

---इन्फो--

शिक्षक, चालकाच्याही घरांची झाडाझडती

मोटारचालक येवलेचे तीन बँकांमध्ये तर त्याच्या पत्नीच्या नावे दोन बँकेत आणि मुलगी, मुलाच्या नावे प्रत्येकी एका बँकेत खाते असल्याचे पथकाने घेतलेल्या घरझडतीत आढळले आहे. तसेच दोन वाहनांचे आरसीबुकही मिळाले आहे. पॉलिसीचीही छाननी केली जात आहेे. शिक्षक दशपुते यांच्या नावावर एक २ बीएचके राहता फ्लॅट, दोन दुचाकी, एसबीआय बँकेत दोन खाती आणि महाराष्ट्र बँकेत १ खाते असल्याचे निष्पन्न झाले आहे.

--इन्फो--

भद्रकाली पाेलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, प्राथमिक शाळेचे शिक्षक संशयित पंकज देशमुख, शासकीय मोटारचालक ज्ञानेश्वर येवले अशा तिघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७, १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शिक्षक, चालकाला शुक्रवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. तसेच वैशाली वीर-झनकर या फरार झाल्याचे पथकाने न्यायालयात सांगितले. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदBribe Caseलाच प्रकरण