नाशिक : शहरातील विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने व्यापारी आणि छोटे-मोठे व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, सर्वसामान्य जनता हजारोंच्या संख्येने दररोज घराबाहेर पडत आहे. नाशिकसह जिल्ह्यातील सर्वच मोठ्या शहरातील मेनरोडवर आणि बाजारपेठेतही जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी आहे. मात्र रस्ते अन्न बाजारपेठेतील वाढत्या गर्दीने कोरोनाचा धोका अधिकच वाढला आहे. कारण सोमवारी (दि. १५) या एकाच दिवसात शहरात ६५ रुग्ण वाढले असून, दिवसभरात आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला, तर एकूण बाधितांची संख्या सातशेच्यावर गेली .कोरोना आणि लॉकडाऊनला खऱ्याअर्थाने शहरांपेक्षा ग्रामीण भागाने गांभीर्याने घेतले. नाशिक जिल्ह्यातील गावेच्या गावेच स्वयंस्फूर्ती सील झाली.बाहेरच्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली. गावातील नागरिकांनाही बाहेर जाण्यास मज्जाव केला गेला. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना अजूनही नियंत्रणात आहे.
वाढत्या गर्दीने कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:33 IST