शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार उद्योजकता मेळाव्यातून हरवली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:22 IST

सध्या उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यास इच्छुक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी भरती असो रोजगार मेळाव्याला नेहमी उसळणारी गर्दी नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यातून हरवल्याचे चित्र दिसून आले.

नाशिक : सध्या उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यास इच्छुक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी भरती असो रोजगार मेळाव्याला नेहमी उसळणारी गर्दी नाशकातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यातून हरवल्याचे चित्र दिसून आले.  नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कर्मवीर अ‍ॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यातर्फे ठाकरे महाविद्यालयात मंगळवारी ‘रोजगार व उद्योजकता मेळावा’ घेण्यात आला. या मेळाव्यात रोजगाराची संधी देणाºया पूर्वनियोजित १७ कंपन्यांमध्ये ऐनवेळी पाच कंपन्यांची वाढ झाली. नियुक्ती करणाºया कंपन्यांची संख्या १७ वरून २२ झाल्याने उपलब्ध जागांची संख्याही ५६८ वरून ६०४ पर्यंत वाढली. परंतु, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचा मेळाव्याला प्रतिसाद मिळण्याचा आयोजकांना विश्वास असताना यावेळच्या रोजगार मेळाव्यातून गर्दीच हरविल्याचे दिसून आले.सध्या विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने यावेळी ६०४ नोकºया उपलब्ध असताना या मेळाव्यात केवळ २७६ विद्यार्थ्यांनीच नोंदणी करून सहभाग घेतला. त्यातील २४४ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, पुढील टप्प्यात यातील बहुतांश उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार असल्याचा विश्वास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक संपत चाटे यांनी यावेळी व्यक्त केला.महामंडळाकडून उद्योजकता मार्गदर्शनठाकरे महाविद्यालयातील रोजगार व उद्योजकता मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह महात्मा फुले महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ व वसंतराव नाईक महामंडळ यांनी विविध घटकांतील उमेदवारांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करतानाच महामंडळांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रानेही उद्योग सुरू करण्यास इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीEmployeeकर्मचारी