शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार इच्छुकांनी भरले हजारो रुपये

By admin | Updated: February 8, 2017 00:51 IST

माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह पाच जणांचा समावेश

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक असलेल्या ना हरकत दाखल्यासाठी इच्छुकांची धावपळ उडाली आहे. याउलट हे दाखले देताना नाशिक जिल्हा परिषदेचा मात्र वर्षानुवर्षे थकीत असलेली हजारो रुपयांची थकबाकी वसूल होण्याचा फायदा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ना हरकत व थकबाकीदार नसल्याबाबत दाखले देण्यात येतात. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या शंभरहून अधिक इच्छुकांनी ना हरकत दाखले घेतले आहेत, तर पाच आजी-माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे थकीत असलेली थकबाकी भरत थकबाकीदार नसल्याचा दाखला घेतला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य जयश्री पवार  यांनी त्यांच्याकडील असलेली ८  हजार ५१२ रुपयांची थकबाकी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात भरल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)सर्वाधिक थकबाकीपंचायत समितीत सदस्य असलेले जगन आगळे यांनी त्यांच्याकडील सुमारे दीड हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडील २५८ रुपयांची थकबाकी जिल्हा परिषदेकडे भरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अनिलकुमार गंगाधर अहेर यांच्याकडील असलेली सुमारे १४३५ रुपयांची, तर सर्वाधिक थकबाकी असलेल्या जिल्हा परिषद सदस्य कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडील २० हजार ३९८ रुपयांची थकबाकी त्यांनी भरली आहे. ना हरकत दाखल्यांच्या निमित्ताने जिल्हा परिषदेची थकलेली हजारो रुपयांची थकबाकी या निमित्ताने भरली गेल्याचे चित्र आहे. यातही अनिल अहेर १९९८ मध्ये अध्यक्ष होते, तर जगन आगळेही २००७ पूर्वी पंचायत समितीत सदस्य असल्याने दशकभरापासून असलेली थकबाकी वसूल करण्यात यश आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.