शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातून हजारो समर्थक सहभागी

By admin | Updated: October 3, 2016 23:55 IST

मूक मोर्चा : कार्यकर्त्यांकडून सुमारे १३०० वाहनांची व्यवस्था

येवला : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मूक मोर्चात शहरासह तालुक्यातून १२८० पेक्षा अधिक वाहनांमधून सुमारे २० हजार ओबीसी बांधवांसह भुजबळ समर्थक जनता सहभागी झाली होती. बहुजन समाजाचे नेते व येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात विविध विकासकामे करून कायापालट केला आहे. केवळ मतदारसंघातीलच नव्हे, तर राज्यभरातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. देशभरात दौरे करून त्यांनी सर्वांना आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करून दिली. सध्या त्यांच्यावर यंत्रणेकडून अन्याय होत असल्याने शहर व तालुक्यातून स्वयंस्फूर्तीने नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. नगरसूल येथून सुमारे १०० छोटी चारचाकी वाहने, पाच ट्रक व तीन बसेसमधून सुमारे तीन हजार नागरिक या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले होते. अंदरसूल येथून अ‍ॅड. सुभाषराव सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मकरंद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी दोन बसेस, दोन ट्रक यांसह १०० छोट्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. नाशिकला भुजबळ समर्थनार्थ मोर्चात सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच औरंगाबादसह मराठवाड्याकडून गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. पिवळ्या रंगाच्या झेंड्यावर छगन भुजबळ यांचे मोठे चित्र होते. गाडीच्या काचांवर स्टीकर लावण्याचे काम विंचूर चौफुलीवर कार्यकर्ते करत होते. छोट्या-मोठ्या वाहनांनी व कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (वार्ताहर)